शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कळमेश्वर - नागपूर मार्गावर पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 21:38 IST

भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देवाहनाची दुचाकीला धडक : दहेगाव शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - नागपूर मार्गावरील वाय पॉईंटजवळ गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.शैलेश जनार्दन भेंडे (३०, रा. वॉर्ड क्रमांक - १, कळमेश्वर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नागपूर शहर पोलीस दलात कॉन्स्टेबलपदी कार्यरत होते. गुरुवारी रात्री ड्युटी संपल्याने ते नेहमीप्रमाणे एमएच-४०/एडी-३१०१ क्रमांकाच्या मोटरसायकलने कळमेश्वरला घरी परत येत होते. कळमेश्वर - नागपूर मार्गावरील दहेगाव शिवारात असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळील वाय पॉईंटजवळ विरुद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पोलिसांनी तातडीने नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे उपचारादरम्यान काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला असून, त्यांना १२ दिवसाचे बाळ आहे. बाळाच्या नामकरण विधीपूर्वीच काळाने बाळापासून वडिलांना हिरावून नेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी कळमेश्वर येथील स्मशानभूमीत पोलीस इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.वाय पॉईंट ‘मृत्यू’चे ठिकाणवारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे दहेगाव (ता. कळमेश्वर) शिवारातील हा वाय पॉईंट आता ‘मृत्यू’चे ठिकाण बनले आहे. यासंदर्भात लोकमतमध्ये काही दिवसांपूर्वी वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. येथील अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक तयार करण्याची सूचना त्या वृत्तात केली होती. शिवाय, तशी मागणीही नागरिकांनी अनेकदा केली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता याच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हा प्रशासनाला जाग येईल काय, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू