शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 मुख्याध्यापकांचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 19:55 IST

Nagpur News भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

नागपूर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ते सालई (ता. रामटेक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत हाेते. ही घटना रामटेक-हिवराबाजार मार्गावरील नवेगाव (पुसदा पुनर्वसन) शिवारात शनिवारी (दि. १५) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

विश्वनाथ कुंभलकर (४०, रा. हिवराबाजार, ता. रामटेक) असे मृताचे नाव आहे. ते सालई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत हाेते. शिवाय, तीन महिन्यांपासून ते रामटेक शहरात राहायचे. शनिवारी सकाळची शाळा असल्याने ते नेहमीप्रमाणे एमएच-४०/एस-२१५८ क्रमांकाच्या माेटरसायकलने रामटेकहून हिवराबाजार मार्गे सालई येथे जायला निघाले. नवेगाव (पुसदा पुनर्वसन) शिवारात विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-३१/सीडी-५७५६ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली.

यात डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात हाेताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून विश्वनाथ यांचा मृतदेह देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला. पाेलिसांनी नाकाबंदी करून अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक पकडला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी ट्रकचालक महेंद्र माधोराव भलावी रा. नवेगाव (चिचदा), ता. रामटेक याच्या विराेधात भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा केला असून, तपास ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या मार्गदर्शनात सतीश नागपुरे करीत आहेत.

वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच...विश्वनाथ कुंभलकर यांना शाश्वत (६) व पार्थ (४) ही दाेन मुले आहेत. पार्थचा शुक्रवारी (दि. १४) वाढदिवस हाेता. काही कारणास्तव त्यांनी पार्थचा वाढदिवस शुक्रवार ऐवजी शनिवारी (दि. १५) सायंकाळी साजरा करणार हाेते. मात्र, त्यापूर्वी काळाने त्यांच्यावर झडप घातली. ते ट्रकच्या समाेरच्या चााकाखाली आल्याने त्यांच्या डाेक्याचा चेंदामेंदा झाला हाेता. ताे ट्रक पुसदा पुनर्वसन शिवारातील माया ब्रिक्स असून, विटा घेऊन जात हाेता.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात