खापा : भरधाव दुचाकी स्लिप झाल्याने राेडवर पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खेकरानाला शिवारात ११ एप्रिलला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
कुशल संजय श्रीवास्तव (२८, रा. अंबाझरी (दिंडाेरी, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव असून, ताे आपल्या मित्रासाेबत स्पाेर्टस् दुचाकीने खेकरानाला येथून बडेगावकडे जात हाेता. दरम्यान खेकरानाला शिवारात भरधाव दुचाकी स्लिप हाेऊन ताे राेडवर पडून गंभीर जखमी झाला. लगेच त्याच्या मित्रांनी त्यांना नागपुरातील खासगी दवाखान्यात भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खापा पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस निरीक्षक अजय मानकर करीत आहेत.