शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अपघात की आत्मघात!

By admin | Updated: July 21, 2015 03:06 IST

साधारणत: मुंबई-पुणे येथील नागरिक निष्काळजीपणे वाहन चालवितात, असा समज आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, २०१४

नागपूर होतेय ‘अपघात’पूर : वर्षभरात रस्ते अपघातात ३७२ बळी योगेश पांडे ल्ल नागपूरसाधारणत: मुंबई-पुणे येथील नागरिक निष्काळजीपणे वाहन चालवितात, असा समज आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, २०१४ या वर्षात निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे राज्यातील सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहेत. वर्षभरात शहरात विविध रस्ते अपघातांत ३७२ नागरिकांचा मृत्यू झाला. यापैकी निष्काळजीपणाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांत जीव गमवाव्या लागलेल्या नागरिकांची संख्या चक्क ३५५ इतकी आहे. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.२०१३ मध्ये रस्ते अपघातांचे बळी जाणाऱ्यांची संख्या २४१ इतकी होती. वर्षभरात वाढलेले हे प्रमाण नागपूरकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारे आहे.नागपूर शहरात १३४४ अपघात झाले. यात ३७२ नागरिकांचा बळी गेला तर १०९७ जण जखमी झाले. जर सरासरी काढली तर दिवसाला ३ हून अधिक अपघात झाले असून, यात दररोज एकाचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त ३५५ मृत्यू हे निष्काळजीपणाने वाहन चालविणे किंवा ‘ओव्हरटेकिंग’च्या नादात झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांच्या तुलनेत या कारणामुळे झालेले मृत्यू हे सर्वाधिक आहेत. अतिवेगाने वाहन चालविण्याच्या उन्मादात ८४ अपघात झाले व यात १५ जणांचा बळी गेला. जर आकडेवारीकडे नजर टाकली तर अपघातास कारणीभूत असलेल्या ८७ जणांना जीव गमवावा लागला, तर काहीही चूक नसलेल्या २८५ जणांचे प्राण गेले.सायंकाळची घाई नडतेय‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार शहरात सर्वात जास्त अपघात हे दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत झाले आहे. सायंकाळच्या काळात शहरातील विविध कार्यालये सुटतात. घरी जाण्याच्या घाईत अनेकदा निष्काळजीपणे वाहन चालविण्यात येते व यातूनच अपघात घडतात. या वेळेदरम्यान वर्षभरामध्ये ४९२ अपघात झाले. दुचाकीस्वार ‘रेड झोन’मध्येशहरातील अपघातांमध्ये सर्वात जास्त बळी दुचाकीस्वारांचे गेले आहेत. वर्षभरात १८६ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला. ट्रकमुळे ६८ तर कारमुळे ३८ जणांचा बळी गेला. वर्षभरात ३३ पादचारी मृत्युमुखी पडले. यातील २२ जणांची काहीच चूक नव्हती. २०१४ वर्षातील सर्वात जास्त अपघात हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान झाले आहेत. या महिन्यामध्ये १ हजार ३४४ पैकी ४७० अपघात झालेत. यातील अनेक अपघात हे प्राणांतिक होते