शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

नागपूर-भंडारा रोडवर भीषण अपघात; चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:21 IST

नागपूर भंडारा मार्गावर असलेल्या मौदाजवळ शनिवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला एका ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लग्न सोहळा आटोपून नागपूरकडे व-हाड घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) उभ्या कंटेनरवर आदळल्याने ४ ठार तर १३ व-हाडी जबर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शनिवारी पहाटे ४. ४५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातात ठार झालेल्यामध्ये वराच्या आजीचा देखिल समावेश आहे. या भीषण अपघाताने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस शिपायी अमित प्रवीण झिलपे यांचा विवाह सोहळा शुक्रवारी रात्री गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे पार पडला. वर-वधूला घेऊन त्यांचे नातेवाईक आणि व-हाडी मंडळी ट्रॅव्हल्सने (एमएच ३१/ सीक्यू ८५४८) ने पहाटे २. ३० ला नागपूरकडे निघाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून बस वेगात नागपूरकडे येत होती. मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगोरी गावाजवळ एक कंटेनर (एमएच ४९/ एटी ३८५५) उभा होता. वेगात असलेली बस कंटेनरवर आदळली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या वराच्या आजी  विठाबाई तुकाराम झिलपे (वय ७२), करुणा विजय खोंडे (वय ५८), आनंद रमेश आठवले (वय २८, सर्व रा. नागपूर) आणि सतीश जांभुळकर (वय ३५, रा. गोंदिया) या चौघांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३० ते ३५ प्रवासी होते. त्यातील  १३ प्रवासी जबर जखमी झाले.  ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी बहुतांश व-हाडी साखरझोपेत होती. अपघातानंतर मोठा आवाज होऊन जोरदार धक्का लागल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. एकमेकांच्या अंगावर पडल्याने नेमके काय झाले, हे काही क्षण अनेकांना कळलेच नाही. नंतर अपघात घडल्याचे लक्षात आले. वर अमित यांचे काका अरविंद तुकाराम झिलपे (वय ४९) हे नागपूरला पोलीस हवालदार आहेत. ते गुन्हेशाखेत सेवारत आहेत. त्यांनी तसेच सोबतच्या मंडळींनी लगेच १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना अपघाताची माहिती कळवली.अवघा गावच मदतीला धावलाअपघातामुळे एवढा मोठा आवाज झाला की सिंगोरीवासियांची झोपच उडाली. गावक-यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक रोखली गेली. दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. 

त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मदतीला आलेले भंडारा अन् मौदा पोलीस तसेच अ‍ॅम्बुलन्सही वाहनांच्या गर्दीत अडकली. बराच वेळ ईकडे तिकडे केल्यानंतर अ‍ॅम्बुलन्स डाव्या बाजुने काढून जखमीजवळ पोहचवण्यात आली. त्यानंतर तीन अ‍ॅम्बुलन्स मध्ये जखमींना आधी भंडारा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर अन्य दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना नागपूरला पाठविण्यात आले. मेयोतील डॉक्टरांनी येथे आणलेल्यांपैकी दोघांना मृत घोषित केले. 

बसचालक पळालाहा अपघात एवढा भीषण होता की बसची डावी बाजू कंटेनरमुळे कापत गेली. अपघातानंतर निर्माण झालेल्या गोंधळात बसचालक खाली उडी मारून पळून गेला. दुपारी २. ३० वाजेपर्यंत तो कुठे गेला, कसा आहे, त्याबाबत पोलीस माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. या अपघाताचे कारण स्पष्ट झाले नाही. बसचालक दारूच्या नशेत होता का, ते देखिल स्पष्ट झाले नाही. मात्र, त्याला झपकी आली असावी अन् त्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज आहे.  

टॅग्स :Accidentअपघात