शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

अंबाझरी आणि पारडीत अपघात : दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:47 IST

दारूच्या नशेत असलेल्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांना जोरदार धडक मारली. त्यानंतर अनियंत्रित ट्रक घरावर जाऊन धडकला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देअनियंत्रित ट्रक घरावर धडकला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूच्या नशेत असलेल्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांना जोरदार धडक मारली. त्यानंतर अनियंत्रित ट्रक घरावर जाऊन धडकला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. घराचेही मोठे नुकसान झाले. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा चौकाजवळ गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. तत्पूर्वी, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कंटेनर चालकाने दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीस्वाराचा करुण अंत झाला.पोलीस हवालदार ईश्वर रामचंद्र बाबल यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार एमएच २८/ बीबी १५८९ क्रमांकाच्या ट्रकचालक आरोपीने निष्काळजीपणे वाहन चालवून अमरावती मार्गावर रस्त्यावर पायी जात असलेल्या जीवन लक्ष्मण कनोजिया (वय ४५, रा. न्यू फुटाळा) आणि संजय हरडे (वय ३८, रा. न्यू फुटाळा) या दोघांना जोरदार धडक मारली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या घराला धडक दिली. यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी वातावरण संतप्त झाले. नागरिकांनी धाव घेऊन जखमी जीवन कनोजिया आणि संजय हारोडे यांना रुग्णालयात भरती केले. तेथे कनोजिया यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी हरडे यांची प्रकृती गंभीर आहे. अंबाझरी पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू आहे.पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास नाका नंबर पाचसमोर भीषण अपघात घडला. मौदा येथील वाकेश्वर बुद्धविहाराजवळ राहणारे अनिल खुशाल वालकर (वय ४४) हे गुरुवारी नागपुरात आले होते. ते आपल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीने दुपारी ४ च्या सुमारास मौदा गावाकडे परत जात असताना कंटेनर क्रमांक एचआर ३८/ एस ९२०० च्या आरोपी चालकाने वालकर यांच्या अ‍ॅक्टिव्हाला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मंगल बकाराम पाटील (वय ५६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू