अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याच्या कामाला गती

By गणेश हुड | Published: September 8, 2023 02:33 PM2023-09-08T14:33:32+5:302023-09-08T14:34:22+5:30

'जलदोस्त' या मशीन बोटीच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याचा प्रयोग

Accelerating the work of water leaf removal from Ambazari lake | अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याच्या कामाला गती

अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याच्या कामाला गती

googlenewsNext

नागपूर : नागपूर शहरातील अंबाझरी तलावात जलपर्णी तयार झाली आहे. तलाव स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने  प्रयत्न सुरु आहे. नॅशनल एरोस्पेस लेबारेटरी व नीरी संस्थेच्या माध्यमातून तयार केलेल्या 'जलदोस्त' या मशीन बोटीच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यामुळे तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामाला गती येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सीएसआयआर- नीरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत  तलाव परिसराची पाहणी करण्यात आली.

महापालिकेतर्फे वेगवेगळ्या पद्धतीने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले जाते. नॅशनल एरोस्पेस लेबारेटरी सहाय्याने तयार करण्यात आलेल्या फ्लोटिंग मशीनला ('जलदोस्त') जलपर्णी काढण्यासाठी तपासून पाहिले गेले. प्राथमिक दृष्ट्या पहिले असता लक्षात आले की, ती मशीन प्रयोग तत्वावर वापरू शकतो. त्यात पुढील काळात गरज असल्यास सुधारणा देखील करू, "असे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी म्हटले.

या मशीन बोटीच्या सहाय्याने सर्व तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामाला गती येईल. मशीन बंगलोर येथून आणली गेली आहे. ही मशीन वापरण्याची सुरुवात नागपूरच्या अंबाझरी तलावापासून करत आहोत. नंतर या माशिनीचा वापर आम्ही भारतभर करणार असल्याची माहिती 'जलदोस्त' तयार करणारे सीएसआयआर- एनएएलचे डॉ. कार्तिकेयन यांनी दिली.

देशातील तलाव स्वच्छ राहावे हे आमचे ध्येय आहे. हि मशीन एअरक्राफ्ट तंत्रज्ञानावर आणि हायब्रीड मरीन तंत्रज्ञानावर चालते. तलावात ज्या ठिकाणी मानवी सहय्याने जलपर्णी काढणे अशक्य आहे तेथे देखील ही मशीन कार्य करते. ५ ते ६ लोक जितकी जलपर्णी काढू शकतात त्यांचे कार्य हि एकटीच मशीन करू शकते असेही कार्तिकेयन  यांनी सांगितले.

Web Title: Accelerating the work of water leaf removal from Ambazari lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.