शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नागपूर  जिल्हा परिषदेच्या सहायक लेखा अधिकाऱ्यावर एसीबीचा ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 23:33 IST

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहा. लेखा अधिकारी सुदाम वामनराव पांगुळ (५४) यांना कार्यालयातच ४,५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

ठळक मुद्दे४,५०० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले बिलाची फाईल मंजूर करण्यासाठी केली लाचेची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहा. लेखा अधिकारी सुदाम वामनराव पांगुळ (५४) यांना कार्यालयातच ४,५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. एका कंत्राटदाराच्या बिलाची फाईल मंजूर करण्यासाठी पांगुळ यांनी पैशाची मागणी केली होती.तक्रारकर्ते न्यू कैलासनगर येथील रहिवासी आहे. ते शासकीय कंत्राट घेऊन बांधकाम करतात. तक्रारकर्त्याने जिल्हा परिषदेच्या मौदा उपविभागांतर्गत एकूण नऊ कामे केली. तक्रारकर्त्याला मिळालेली नऊही कामे त्याने वेळेवर पूर्ण करून कामाच्या बिलाची फाईल जिल्हा परिषद नागपूर कार्यालयातील लेखा विभागाकडे पाठविली. या विभागात सहा. लेखा अधिकारी सुदाम पांगुळ हे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ही फाईल मंजुरीसाठी आली होती. परंतु या नऊ फाईलच्या मंजुरीसाठी पांगुळ यांनी तक्रारकर्त्यास लाच मागितली. सूत्रांच्या माहितीनुसार तक्रारकर्त्याने यापूर्वी पांगुळ यांनी लाचेच्या रूपात पैसेही दिले. पण पांगुळ आणखी पैसे मागत होते. पांगुळने पुन्हा तक्रारकर्त्यास ४,५०० रुपये मागितले. तक्रारदाराची वारंवार पैसे देण्यास इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप जगताप यांनी तक्रारीची गोपनीयरीत्या शहानिशा करून बुधवारी सापळा रचला. या सापळ्यात पांगुळ रंगेहात सापडले. पांगुळ यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांच्या घराची झाडाझडतीही अ‍ॅन्टीकरप्शन विभागाची चमू घेत आहे. पांगुळ आहे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारीसुदाम पांगुळ हे जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचारी संघटनेच्या वरिष्ठ पदावर आहेत. संघटनेच्या बळावर चार वर्षांपूर्वी ते पं.स. मौदा येथून जि.प.च्या वित्त विभागात सहा. लेखा अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. यापूर्वीही त्यांच्याविरोधात कंत्राटदारांच्या तक्रारी होत्या. एका विद्यमान आमदारांच्या जवळचे होते. राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारीसुद्धा त्यांच्याकडून टेबल काढण्यास घाबरत होते. कंत्राटदारांशी मात्र त्यांची बिल मंजूर करण्यासाठी वारंवार तू तू मै मै होत होती. पांगुळला यापूर्वीही एका प्रकरणात निलंबित करण्यात आले होते, अशी सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर