शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबाग रेल्वे वर्कशॉपमध्ये होणार एसी कोचची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:24 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोतीबाग वर्कशॉपमध्ये ब्रॉडगेज कोचची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. आता येथे एसी कोचच्या दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून यामुळे मोतीबाग वर्कशॉपला नव संजीवनी प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देरेल्वे अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोतीबाग वर्कशॉपमध्ये ब्रॉडगेज कोचची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. आता येथे एसी कोचच्या दुरुस्तीची सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून यामुळे मोतीबाग वर्कशॉपला नव संजीवनी प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा नागपूर विभागाचा माल वाहतुकीसाठी देशभरात नावलौकिक आहे. या विभागांतर्गत नॅरोगेज रेल्वेचे सर्वाधिक जाळे आहे. त्यामुळे मोतीबाग वर्कशॉपमध्ये नॅरोगेज रेल्वेच्या इंजिनसह कोचच्या दुरुस्तीची व्यवस्था करण्यात आली होती. कालांतराने देशभरातील नॅरोगेज मार्ग संपविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. त्यानुसार ब्रॉडगेजचे जाळे नागपूरपर्यंत पोहोचले आणि नॅरोगेज मार्गाला ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले. त्यानंतर नॅरोगेज रेल्वेगाड्या बंद होऊन कोच आणि इंजिनच्या दुरुस्तीचे काम कमी झाले. रेल्वे प्रशासनाने मोतीबाग वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या हाताला काम देण्यासाठी येथे ब्रॉडगेज कोचच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू केले. आता झपाट्याने ब्रॉडगेजचे काम सुरू असल्यामुळे आगामी काळात येथे एसी कोचच्या दुरुस्तीची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मोतीबाग वर्कशॉपला नव संजीवनी मिळविण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBudgetअर्थसंकल्प