शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

‘रॉ’च्या लोगो आणि छायाचित्राचाही गैरवापर : सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:48 AM

येथील एका महिलेसोबत लग्न करण्यासाठी स्वत:ला ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगणारा ठगबाज इमरान खान नूर मोहम्मद खान (वय ३९, रा. रा. शिवाजीनगर गोवंडी मुंबई) याने संबंधित महिलेला रॉ चा लोगो आणि काही छायाचित्रेही पाठविली होती, असे तपासात उघड झाले आहे. परिणामी सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. इमरानला गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.

ठळक मुद्देठगबाज इमरानला पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील एका महिलेसोबत लग्न करण्यासाठी स्वत:ला ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगणारा ठगबाज इमरान खान नूर मोहम्मद खान (वय ३९, रा. रा. शिवाजीनगर गोवंडी मुंबई) याने संबंधित महिलेला रॉ चा लोगो आणि काही छायाचित्रेही पाठविली होती, असे तपासात उघड झाले आहे. परिणामी सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. इमरानला गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.इमरान हा मुंबई पोलिसांचा पंटर म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगताची माहिती आहे. दोन महिन्यापूर्वी त्याची गिट्टीखदानमधी्रल एका घटस्फोटित महिलेसोबत ओळख झाली. तिच्यासोबत लग्न करण्याची बतावणी करून इमरानने स्वत:ची ओळख ‘रॉ’ एजंट म्हणून दिली होती. महिलेविरुद्ध नोव्हेंबर २०१८ मध्ये अंबाझरी ठाण्यात एकप्रकरण दाखल झाले होते. तिने हे इमरानला सांगताच त्याने अंबाझरी ठाण्यातील अधिकाऱ्यासोबत संपर्क केल्याची थाप मारून महिलेला या प्रकरणातून सोडविण्याचीही बतावणी केली होती. त्यामुळे महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्याचा गैरफायदा घेत आरोपी इमरानने तिच्याकडून वेगवेगळ्या नावाखाली रक्कम उकळणे सुरू केले. तिच्याकडून ३० हजार रुपये उकळणाºया इमरानकडून मोठमोठ्या थापा मारून रक्कम मागितली जात असल्यामुळे महिलेला संशय आला. तो नागपुरातच मुक्कामी असल्याने महिलेने त्याला काही प्रश्न विचारले त्यामुळे तो संतापला आणि दारूच्या नशेत त्याने गोंधळ घालणे सुरू केले. पोलिसांचे नाव काढताच आपले पोलीस काय बिघडवणार, अशी विचारणा करून स्वत:च गिट्टीखदान ठाण्यात पोहचला. एवढेच नव्हे तर स्वत:ला रॉ एजंट संबोधून त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला. त्यामुळे त्याची पोलखोल झाली. त्याला अटक केल्यानंतर प्राथमिक तपासात इमरानने रॉ चा लोगो आणि काही छायाचित्रेही महिलेकडे पाठविली होती, असे उघड झाले आहे. परिणामी सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.संवेदनशील मुद्यांचीही तपासणीइमरानने कधी पाकिस्तान तर कधी दुसऱ्या देशात असल्याची थाप मारून महिलेला बँक खात्यात रक्कम जमा करायला लावली. ते बँक खाते कुणाचे आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचे पाकिस्तानसह अन्य देशात नातेवाईक आहेत. त्यांच्याशी याचे संवेदनशील मुद्यांच्या संबंधाने काही कनेक्शन आहे का, त्याचीही आता चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी