शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीकडे ३ कोटी ४० लाख पाठ्यपुस्तकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:26 IST

समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जि.प.च्या शाळेतील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी शाळांना बालभारतीकडे पाठ्यपुस्तकाची मागणी नोंदवावी लागते. येणाऱ्या सत्रासाठी १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ४० लाखाहून अधिक किमतीच्या पाठ्यपुस्तकाचीऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जि.प.च्या शाळेतील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. त्यासाठी शाळांना बालभारतीकडे पाठ्यपुस्तकाची मागणी नोंदवावी लागते. येणाऱ्या सत्रासाठी १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ४० लाखाहून अधिक किमतीच्या पाठ्यपुस्तकाचीऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे धोरण आहे. याअंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित, शासकीय, अंशत: अनुदानित, समाजकल्याण अनुदानित या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो. २०१९-२० या वर्षाकरिता शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहे, हे विशेष. जि.प. च्या शाळांनी बालभारतीच्या वेबसाईटवर पटसंख्येनुसार ही नोंदणी करावयाची होती. शाळेने भरलेल्या यु-डायसनुसार वर्ग १ ते ५ ला ९९,१११ विद्यार्थी, ५ ते ८ ला ९८, ८०५ असे एकूण १ लाख ९७ हजार १६ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. शाळांना मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्यामार्फत मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकाची उचल बालभारतीकडून करण्यात येणार आहे.इयत्ता १ ते ८ मधील एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व तालुकास्तरीय शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना केले आहे. पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठ्यपुस्तके ब्लॉकस्तरावर उपलब्ध होतील. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शाळेत सर्व पुस्तके पोहोचविण्याचे नियोजन असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ जून रोजी पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा