Nagpur Graduate Constituency; महाविकास आघाडीतर्फे अभिजित वंजारी यांचा अर्ज दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 10:44 AM2020-11-12T10:44:47+5:302020-11-12T15:36:54+5:30

Election Nagpur News येत्या १ डिसेंबरला होत असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांनी गुरुवारी सकाळी अर्ज दाखल केला.

Abhijit Vanjari's application filed; Happiness among the workers | Nagpur Graduate Constituency; महाविकास आघाडीतर्फे अभिजित वंजारी यांचा अर्ज दाखल 

Nagpur Graduate Constituency; महाविकास आघाडीतर्फे अभिजित वंजारी यांचा अर्ज दाखल 

Next
ठळक मुद्देभाजपचा चक्राव्युह भेदणार


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: येत्या १ डिसेंबरला होत असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांनी गुरुवारी सकाळी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस कायकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शक्तीप्रदर्शन केले.  विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी महा विकास आघाडीतर्फे गुरुवारी ऍड.अभिजित वंजारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडे असलेला हा मतदारसंघ यावेळी जिंकण्यात नक्कीच यश मिळेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर वंजारी यांनी नेते व समर्थकांसह दाखल होत उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग, काँग्रेस नेते नाना गावंडे, डॉ. बबनराव तायवाडे, सरचिटणीस मुन्ना ओझा, प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार लढविणार असल्याचे सूतोवाच केले असले तरी वंजारी हे महा विकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी नक्कीच सोबत राहील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला. काँग्रेस पूर्ण रणनीती आखून मैदानात उतरली असून भाजपचा चक्रव्युह तोडला जाईल असा दावा त्यांनी केला.

रोजगार व स्वयंरोजगार यासारख्या अनेक प्रश्नांनी पदवीधर त्रस्त आहेत. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक आराखडा तयार करून तो सरकार दरबारी मांडून त्यावर उपाय योजने, याला आपले प्राधान्य राहील.

- ऍड. अभिजित वंजारी

Web Title: Abhijit Vanjari's application filed; Happiness among the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.