शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

नागपुरात १० लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 20:05 IST

१० लाखांच्या खंडणीसाठी दोन गुंडांनी एका डॉक्टरचे अपहरण केले. त्यांना त्यांच्याच कारमध्ये कोंबून चाकू मारला. रोख आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आणि दोन तासानंतर सोडून दिले.हे अपहरणनाट्य सक्करदरा ते सेंट्रल एव्हेन्यूवर घडले.

ठळक मुद्देचाकूने मारले : रोख, अंगठी आणि सोनसाखळी हिसकावून घेतलीदोन्ही आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० लाखांच्या खंडणीसाठी दोन गुंडांनी एका डॉक्टरचेअपहरण केले. त्यांना त्यांच्याच कारमध्ये कोंबून चाकू मारला. रोख आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आणि दोन तासानंतर सोडून दिले. एखाद्या सिनेमातील वाटावे असे हे अपहरणनाट्य रविवारी रात्री ९.४५ ते ११. ४५ या वेळेत सक्करदरा ते सेंट्रल एव्हेन्यूवर घडले.डॉ. केदार शरद जोशी (वय ५०) असे पीडित डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे सक्करदऱ्यात उमरेड मार्गावरील ताजश्री टॉवरमध्ये एक्स-रे आणि सोनोग्राफी क्लिनिक आहे. रविवारी सर्व कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी त्यांचा कर्मचारी योगेश इंगोलेला आपल्या डस्टर कारमध्ये टिफीन ठेवण्यास सांगितले. रात्री ९.४५ वाजता जोशी घरी जाण्यासाठी आपल्या डस्टर कारजवळ (एमएच ४९/बी ३७०२) आले. कारचे दार उघडताच आरोपी रोशन अशोक राऊत (वय ३०,रा. गौरव अपार्टमेंट, गजानन शाळेसमोर, न्यू सुभेदार ले-आऊट), जुगनू ऊर्फ प्रीतम ज्ञानेश्वर वानखेडे (वय ३०, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्वर) या दोघांनी डॉ. जोशींना त्यांच्या कारच्या मागच्या सीटवर ढकलले. एकाने लगेच ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेत कार पुढे काढली. डॉ. जोशींनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्याने जवळचा चाकू काढून त्यांच्या नाकावर मारला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, दोन अंगठ्या तसेच पर्समधील ४० हजार रुपये हिसकावून घेतले.१० लाख दे अन्यथा ठार मारूआरोपी डॉ. जोशींना त्यांच्याच कारमध्ये इकडे-तिकडे दोन तास फिरवत होते. १० लाख रुपये द्या, अन्यथा रायपूर(छत्तीसगड)मध्ये नेऊन ठार मारू, अशी धमकी आरोपी देत होते. जोशी यांनी आरोपींना आपल्याकडे रक्कम नसल्याचे पटवून दिल्यानंतर आरोपींनी रात्री ११.४५ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील साबू हॉस्पिटलसमोरच्या गल्लीत सोडले. त्यानंतर कार सोडून आरोपी पळून गेले.पोलिसांची धावपळआरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर डॉ. जोशी सक्करदरा पोलिसांकडे पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी अपहरण आणि लुटमारीचा गुन्हा दाखल केला. लगेच घटनास्थळ गाठून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत दोन्ही आरोपींना सोमवारी पहाटे अटक केली.

टॅग्स :doctorडॉक्टरKidnappingअपहरणArrestअटक