शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत विद्यार्थीनी नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:01 IST

अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून अहमदाबादला पळवून नेणाऱ्या तरूणाचा लोहमार्ग पोलिसांनी शोध घेतला. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. कायदेशिर कारवाईनंतर दोघांनाही शुक्रवारी रात्री देवलापार पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांनी घेतला शोध : देवलापार पोलिसांकडे सोपविले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून अहमदाबादला पळवून नेणाऱ्या तरूणाचा लोहमार्ग पोलिसांनी शोध घेतला. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. कायदेशिर कारवाईनंतर दोघांनाही शुक्रवारी रात्री देवलापार पोलिसांच्या ताब्यात दिले.कविता (बदललेले नाव) असे अपहरण झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अल्पवयीन असून ११ व्या वर्गात शिकते. अपहरण करणारा आकाश हा २१ वर्षांचा असून त्याचे लग्न झाले आहे. कविता आणि आकाश यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. आकाशने तिला फुस लाऊन पळविले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता कविता तिच्या मैत्रीणीसोबत घरुन निघाली. ठरल्याप्रमाणे आकाश त्यांना भेटला. आकाश त्यांना घेऊन भंडाऱ्याला गेला. भंडाऱ्यावरून कविताची मैत्रीण घरी परतली. घडलेला प्रकार तिने कविताच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे कविताच्या कुटुंबीयांनी आकाशविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कविता अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. देवलापार पोलिसांनी लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक रोशन खांडेकर यांना विद्यार्थिनी आणि अपहरण करणाऱ्याआरोपीची माहिती दिली. आकाश आणि कविता दोघेही गणेशपेठ बसस्थानकावर आले. तेथून पायी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. अहमदाबादला जाण्यासाठी ते प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर मुंबई एण्डकडील भागात बसले होते. लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक रोशन खांडेकर, उपनिरीक्षक घाडगे, शिपाई भास्कर पांडे, महिला पोलीस सातारकर यांनी रेल्वेस्थानकावर शोध घेतला. त्यांना दोघेही प्लॅटफार्मवर आढळले. त्यांची चौकशी करून लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. ते सापडल्याची माहिती देवलापार पोलिसांना देण्यात आली. देवलापार पोलीस आल्यानंतर या दोघांनाही त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :KidnappingअपहरणStudentविद्यार्थीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर