शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आबा, दाजी, तात्याही दिसणार ईव्हीएमवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:33 IST

टोपण नाव आतापर्यंत निवडणुकीत अधिकृत नव्हते. पण यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी टोपण नाव ईव्हीएमवर दिसण्याची सोय उपलब्ध केली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने उमेदवारांच्या टोपण नावाची करून दिली सोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अख्खा महाराष्ट्र आबा, बाबा म्हणून ओळखतो. असे अनेक नेते, मंत्री, राजकारणी आहेत जे त्यांच्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. हे टोपण नाव आतापर्यंत निवडणुकीत अधिकृत नव्हते. पण यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी टोपण नाव ईव्हीएमवर दिसण्याची सोय उपलब्ध केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ज्या उमेदवारांना आपले टोपण नाव, उपनाव, विशेष नाव ईव्हीएमवर छापण्याची इच्छा आहे, त्या उमेदवारांनी मागणी केल्यास निवडणूक आयोग त्यांची मागणी पूर्ण करणार आहे.ग्रामीण भागामध्ये टोपण नावाचा वापर लहानपणापासून होतो. पुढे ते व्यक्तिमत्त्व त्या टोपण नावाने ओळखल्या जाते. ग्रामीण भागामध्ये अशी अनेक उदाहरणे आहे, ज्यांना तात्या, अण्णा, दादा, मामा, दाजी, आबा या नावाने पुकारले जाते. याच नावाने त्यांना अख्खे गावही ओळखते. गावात अशा टोपण नावाने प्रसिद्ध असलेली मंडळी जेव्हा राजकारणात उतरतात तेव्हा प्रचारात अथवा ईव्हीएमवर त्यांना आपले मूळ नावच नमूद करावे लागते. पण यंदा राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जे उमेदवार उभे आहे. त्यांना टोपण नावाने गावात ओळखले जाते. अशा उमेदवारांना त्यांच्या मूळ नावाबरोबरच टोपण नाव सुद्धा मतपत्रिकेवर, ईव्हीएम मशीनवर नमूद करण्याची सोय आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने २६ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, काही वेळा संबंधित उमेदवार त्यांच्या मतदार संघात काही विशेष नाव, उपनाव व टोपण नावाने ओळखले जातात. अशावेळी उमेदवारांकडून भरण्यात येणाऱ्या नामनिर्देशनपत्रात लिहिलेल्या नावाच्या व्यतिरिक्त विशेष नाव मतपत्रिकेवर छापण्याची इच्छा आहे त्या उमेदवारांनी लेखी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करावी.यासाठी आयोगाने एक अर्ज सोबत दिला आहे. तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नावाने आहे. त्यात मतपत्रिकेवर काय नाव छापावे याचा बॉक्स दिला आहे. तो बॉक्स इंग्रजी आणि मराठीतून भरून द्यायचा आहे. हा अर्ज भरून दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी त्या उमेदवाराची योग्य खातरजमा करणार आहे. विशेष म्हणजे हा अर्ज नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे.कळमेश्वरच्या तहसीलदारांनी तयार केला उमेदवारांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपजि.प. व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कुठलीही माहिती, निवडणूक विभागाचे परिपत्रक, वेळापत्रक आदी माहिती तात्काळ देता यावी यासाठी कळमेश्वरचे तहसीलदार सचिन यादव यांनी सर्व उमेदवारांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप तयार केला आहे. या ग्रूपमध्ये निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. तहसीलदारांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे सर्व उमेदवारांना आवश्यक ती माहिती वेळेत मिळण्यास मदत होत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकEVM Machineएव्हीएम मशीन