शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

चिमुकल्या आर्यनला पाळण्याचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 02:45 IST

आर्यन आता एक वर्षाचा झाला होता. नुकताच ९ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवसही झाला. बोबडे शब्द बोलत घरात खेळणारा, बागळणारा तान्हा आर्यन सर्वांना हवाहवासा झाला होता.

मंगर कुटुंबीयांवर शोककळा : सोमलवाडा परिसरात घडली घटनानिशांत वानखेडे  नागपूरआर्यन आता एक वर्षाचा झाला होता. नुकताच ९ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवसही झाला. बोबडे शब्द बोलत घरात खेळणारा, बागळणारा तान्हा आर्यन सर्वांना हवाहवासा झाला होता. वडील त्याच्या भविष्यासाठी मेहनत घेत होते. पतीसोबत घराला आर्थिक आधार मिळावा म्हणून आर्यनची आईही घरकाम करायला जात होती. त्याही दिवशी ती नेहमीप्रमाणे अंगाईगीत गाऊन आर्यनला पाळण्यात झोपवून कामाला गेली, मात्र ज्या पाळण्यात टाकताच रडणारे बाळ शांत होते तोच पाळणा आपल्या बाळाला कायमचा शांत करेल हे त्या माऊलीला कुठे माहीत होते. परतली तेव्हा तिचे काळीजच फाटले होते. नियतीने याच पाळण्याला बांधलेला दुपट्टा फास बनवून चिमुकल्या आर्यनचे प्राण हरले.हृदयाला चटका लावणारी ही घटना सोमलवाड्याच्या राहुलनगर परिसरात घडली. आर्यन गोपाल मंगर असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव. काळाने येथील मंगर कुटुंबीयावर मोठा घाव घातला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यनचे वडील गोपाल विठ्ठल मंगर एका कंपनीत मार्केटिंगच्या कामाला आहेत. लग्नाला सहा वर्षे झाली व संसाराला दोन फुलेही आली. मोठा अनिकेत व लहान आर्यन. त्यांच्या घरीच गोपालची बहीण आणि जिजा सोबत राहतात. तेही दररोज कामाला जातात. गोपालच्या कमाईसह मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार मिळावा म्हणून गोपालची पत्नी सीमा आसपासच्या परिसरात घरकाम करायला जाते. बाळाला पाळण्यात झोपवायचे आणि कामाला जायचे, असा तिचा नित्यक्रम. शुक्रवारीही रोजच्या प्रमाणे सर्व कामावर निघून गेले होते. सीमानेही आर्यनला पाळण्यात झोपविले. सवयीप्रमाणे बाळ पाळण्यातून पडू नये म्हणून कमरेजवळ तिने दुपट्टा बांधला. मात्र हाच दुपट्टा आर्यनसाठी काळ ठरला. अचानक आर्यनला जाग आली आणि तो पाळण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला. निष्काळजीपणा की कुटुंबाची गरज?नागपूर : मात्र आर्यनचा हंबरडा ऐकायला तिथे कुणीही नव्हते. या प्रयत्नात पाळणा उलटा झाला आणि कमरेभोवतीचा सैल झालेला दुपट्टा गळ्यापर्यंत सरकला आणि त्यानेच फास लागला. घटना दुपारी १२ ते १२.३० वाजता घडल्याचे गोपाल यांनी सांगितले. १ वाजताच्या दरम्यान आर्यनची आत्या कामे आटोपून घरी पोहचली तेव्हा तिनेही हंबरडा फोडला. मात्र स्वत:ला सावरत तिने भाऊ गोपालला फोन केला आणि तातडीने आर्यनला जवळच्या रुग्णालयातही नेले. मात्र आर्यन कायमचा हरवला होता. आर्यन आता सोडून गेला. मात्र यात चूक कुणाची हा प्रश्न निर्माण होतो. पाळण्याला दुपट्टा बांधून आणि त्याहीपेक्षा बाळाला एकटे सोडून जायला नको होते. या निष्काळजीपणातूनच आर्यनचा मृत्यू झाला, असे चर्चिले जात आहे. मात्र हा त्या माऊलीचा निष्काळजीपणा की, कुटुंबाची गरज भागविण्याची धडपड हा प्रश्न आहे. कारण सायंकाळच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी ती कामावर निघून गेली. घरी गेल्यावर तान्हुल्या आर्यनला चिऊचा घास देऊ, असे तिचे स्वप्नरंजन होते. मात्र नियतीला वेगळेच मंजूर होते.-आर्यनची आई सीमा निपचित पडली होती. बोलायची इच्छा नसतानाही वडील गोपाल यांनी घडलेली हकीकत सांगितली. मात्र हे सांगताना बापाच्या डोळ्यांच्या कडांचा ओलावा थांबत नव्हता. (प्रतिनिधी)