शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर मतदार' नोंदणीसाठी 'आधार' ऐच्छिक ! निवडणुकीसाठी आयोगाची अधिसूचना

By आनंद डेकाटे | Updated: September 15, 2025 20:10 IST

Nagpur : ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणीवरून कळीचा मुद्दा ठरलेल्या आधार कार्डवरून चांगलाच सावळागोंधळ निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता राज्यातील आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणीसाठीही आधार कार्ड ऐच्छिक करण्यात आले आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदारनोंदणी अधिसूचनेमध्ये नोंदणी अधिकाऱ्यांवर आधार कार्डबाबत कडक सूचना देण्यात आल्या असून, या कार्डअभावी कुणाचीही नोंदणी रद्द करू नये, असे स्पष्टपणे बजावले आहे. एवढेच नव्हे तर आधार कार्डची माहिती सार्वजनिक झाल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याविरूध्द कठोर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या निवडणुकीसाठी ३० सप्टेंबर २०२५ रोजी मतदार नोंदणीची सूचना प्रसिद्ध होईल. ३० डिसेंबर, २०२५ रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढील वर्षी २०२६ मध्ये राज्यातील औरंगाबाद, पुणे, नागपूर पदवीधर आणि अमरावती, पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी १२ सप्टेंबरला राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीफिकेशन काढले आहे.

अर्जाचा नवा नमुना प्रसिध्द होणार

या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अधिनियम १९६० च्या कलम ३१(२) अन्वये जुना नमुना अर्जाच्या ऐवजी सुधारीत नमुना प्रसिद्ध् केला जाणार आहे. त्यासाठीचे छपाईचे आदेशही शासकीय मुद्रणालयास देण्यात आले आहेत.

असा आहे कार्यक्रम

  • मतदार नोंदणी कायद्यानुसार जाहीर सूचना प्रसिद्ध करणे : ३० सप्टेंबर
  • वर्तमानपत्रात नोटीस : १५ ऑक्टोबर
  • वर्तमानपत्रात द्वितीय नोटीस : २५ ऑक्टोबर
  • नमुना १८, १९ द्वारे दावे, हरकती स्वीकारण्याचा शेवटचा दिवस : ६ नोव्हेंबर
  • प्रारुप मतदार याद्यांची छपाई : २० नोव्हेंबर
  • प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी : २५ नोव्हेंबर
  • दावे, हरकती स्वीकरण्याचा कालावधी : २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर
  • पुरवणी यादी तयार करणे, छपाई करणे : २५ डिसेंबर
  • मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० डिसेंबर
टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक 2024nagpurनागपूर