शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाइनशॉपजवळ खाद्यपदार्थांची हातगाडी लावली म्हणून महिलेचा कानच फाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2023 20:51 IST

Nagpur News वाइनशॉपजवळ खाद्यपदार्थांची हातगाडी लावली म्हणून वस्तीतीलच एका तरुणाने महिलेवर हल्ला करत तिचा कानच फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नागपूर : वाइनशॉपजवळ खाद्यपदार्थांची हातगाडी लावली म्हणून वस्तीतीलच एका तरुणाने महिलेवर हल्ला करत तिचा कानच फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ललिता नामक महिलेने काही दिवसांपूर्वी रामेश्वरी चौकातील वाइनशॉपच्या शेजारीच खाद्यपदार्थांची हातगाडी  लावली. गौरव हरले (२६, हावरापेठ) याने तिला न विचारता हातगाडी कशी काय लावली असे विचारत धमकी दिली होती. मात्र महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. गुरुवारी रात्री तो परत आला व त्याने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवाय हातगाडी न लावण्याबाबत परत धमकी दिली. महिलेने त्याला विरोध केला असता त्याने हातगाडीवरील सामान फेकले. त्यानंतर त्याने महिलेवर हल्ला करत तिला मारहाण केली तसेच डाव्या कानाला जोरात खेचले. यामुळे ‘इअररिंग’च्या जागेजवळ कान फाटला व रक्तस्त्राव सुरू झाला. हे पाहून गौरव तेथून पळून गेला. महिलेने पोलिसांना बोलावले. पोलिस घटनास्थळी आले व महिलेला मेडिकलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. तिच्या तक्रारीवरून आरोपी गौरवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी