शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

जंगल सफारीच्या पहिल्याच दिवशी वाघांची डरकाळी; पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांनी घेतला आनंद

By निशांत वानखेडे | Updated: October 1, 2024 16:04 IST

७० जीप्सी जंगल सफारीसाठी : ५० पेक्षा अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य

नागपूर/देवलापारनागपूर : पावसाळ्यानंतर १ ऑक्टाेबरपासून नागपूर विभागातील सर्व अभयारण्यात सफारी सुरू केल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी पर्यटकांनी जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला. अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या काही गेटवरून पर्यटन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सफारीसाठी पर्यटकांची माेठी गर्दी पाहायला मिळाली. रामटेक तालुक्यातील सिल्लारी गेटकडून सफारीला गेलेल्या काही पर्यटकांना टी-६२ वाघीण व तिच्या तीन बछड्यांचे मनमाेहक दर्शनही झाले.

टी-६२ वाघीण तिच्या बछड्यांसह फेफाडीकुंड रस्त्यावर फिरत असताना काही पर्यटकांनी माेबाईल कॅमेरात कैद केलेले तिचे फाेटाे ‘लाेकमत’कडे पाठविले. अतिवृष्टीमुळे रस्त्याची परिस्थिती लक्षात घेता सद्य:स्थितीत पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेट, खुर्सापार गेट, बनेरा गेट व चाेरबाहुली गेटवरून सफारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. सध्या जंगल सफारी करणाऱ्यांना १५ ऑक्टोंबरपर्यंत ऑफलाइन पद्धतीने बुकींग करावी लागणार आहे. १६ ऑक्टाेबरनंतर ऑनलाईन बुकिंग सुरू हाेईल.

बफर क्षेत्रात राहते टायरगरची मुव्हमेंट१९७५ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन ४३९.८४ कि.मी. तर बफर झोन २०५.०३ कि.मी. इतका आहे. या व्याघ्र प्रकल्पात सुमारे ५५ पेक्षा अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र वाघ, बिबट, अस्वल आदी वन्य जीवांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरत असून; पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातही वाघांची मुव्हमेंट असते.

"पेंच व्याघ्र प्रकल्पात मंगळवारपासून जंगल सफारी सुरू झाली. येथे पहिल्या दिवसापासूनच ऑनलाइन बुकींग सुरू झालेली आहे. पहिल्या दिवशी माेठ्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली. सफारीकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत."

-विवेक राजुरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, सिल्लारी.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवnagpurनागपूर