शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चाळे करून ऑटोत विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीस अटक

By दयानंद पाईकराव | Updated: March 30, 2024 18:10 IST

नागपूर : हिंगणा परिसरात प्रोफेशनल कोर्सच्या तृतीय वर्षाला शिकत असलेली २० वर्षीय विद्यार्थिनी ऑटोत बसली असताना तिच्याशी अश्लील कृत्य ...

नागपूर : हिंगणा परिसरात प्रोफेशनल कोर्सच्या तृतीय वर्षाला शिकत असलेली २० वर्षीय विद्यार्थिनी ऑटोत बसली असताना तिच्याशी अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अजनी पोलिसांनी गजाआड केले आहे.

कुणाल अनिल लोंदे (३२, रा. विद्यानगर, नंदनवन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो खासगी कंपनीत जॉब करतो. तर पिडीत वाठोडा परिसरातील रहिवासी असलेली विद्यार्थिनी हिंगणा परिसरातील एका महाविद्यालयात प्रोफेशनल कोर्सच्या तृतीय वर्षाला शिकते. मागील अनेक दिवसांपासून आरोपी कुणाल हा विद्यार्थिनीचा पाठलाग करीत होता. विद्यार्थिनी बसलेली असलेल्या ऑटोतून तो प्रवास करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. आतापर्यंत ५ जानेवारी ते २९ मार्च २०२४ दरम्यान आरोपीने तीन-चार वेळा विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले. परंतु बदनामीच्या भितीने विद्यार्थिनीने ही बाब कुणालाही सांगीतली नाही.

शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता पिडीत विद्यार्थिनी लोकमान्यनगर हिंगणा रोड येथून ऑटोत बसून घराकडे परत येत होती. आरोपी कुणालही विद्यार्थिनीच्या ऑटोत बसला. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून तिच्या मनाला लज्जा होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. आरोपीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून पिडीत विद्यार्थिनीने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपी कुणाल विरुद्ध कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी