शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

९० अंश वाकलेला कणा... पण मनोबल होतं सरळ : ‘पुष्पा’ पुन्हा उभी राहिली!

By सुमेध वाघमार | Updated: July 4, 2025 18:52 IST

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी : १२ वर्षांची मुलगी पुन्हा सरळ उभी!

नागपूर : 'पुष्पा' चित्रपटातील 'झुकेगा नही...' हा प्रसिद्ध डायलॉग एका १२ वर्षांच्या मुलीने आपल्या आयुष्यात खरा करून दाखवला आहे. पाठीच्या टीबीमुळे तिचा कणा वाकडा झाला होता आणि ती वाकून चालण्यास मजबूर होती. त्यातच तिचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असल्याने मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार करणे त्यांच्या आवाक्याबाहेर होते. परंतु 'एक ना एक दिवस मी पुन्हा सरळ उभी राहीन' या तिच्या जिद्दीला एका निमशासकीय रुग्णालयाने आणि तेथील डॉक्टरांनी मदतीचा हात दिला. अत्यंत गुंतागुंतीची आणि जीवघेणी शस्त्रक्रिया यशस्वी करून, त्यांनी तिला पुन्हा एकदा सरळ उभे केले आणि जीवनाची नवी उमेद दिली.   

'पुष्पा' (नाव बदललेले) या १२ वर्षीय मुलीला काही दिवसांपासून तीव्र पाठदुखीचा त्रास होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेत असतानाही तिच्या आजाराचे निदान होऊ शकले नाही, परिणामी तिची प्रकृती बिघडतच गेली. ती पुढे वाकून चालू लागली, नीट बसता किंवा उभेही राहता येत नव्हते, वजन खूप कमी झाले होते आणि पाठीवर एक मोठा उंचवटा निर्माण झाला होता. या अवस्थेला 'गिब्बस डिफॉर्मिटी' असे म्हणतात. यामुळे ती कायमस्वरूपी अपंग होण्याचा आणि मूत्र व मलाशयावरील ताबा जाण्याचा धोका होता. शेवटचा पर्याय म्हणून 'पुष्पा' शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी येथील बालरोग विभागात दाखल झाली. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तिला पाठीला टीबी असल्याचे आणि त्यामुळे गंभीर वाकडेपणा (कायफोस्कोलियोटिक डिफॉर्मिटी) असल्याचे निदान केले.

९० अंशाचा वाकलेला कणा, ६ तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रियाब्रेन आणि स्पाइन सर्जन आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. परेश कोरडे यांनी सांगितले की, टीबीमुळे तिच्या दोन मणक्यांमधील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले होते, ज्यामुळे पाठीला तब्बल ९० अंशाने वाकडेपणा आला होता. यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय होता. तब्बल ६ तास चाललेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी आपल्या अनुभव आणि कौशल्याच्या बळावर यशस्वी केली. डॉक्टरांच्या चमूने रॉड्स, स्क्रू आणि मेटल केजच्या मदतीने मुलीचा वाकलेला पाठीचा कणा सरळ करून स्थिर केला. तिचे मणके लहान आणि नाजूक असतानाही, डॉक्टरांनी तिचा कणा योग्य रचनेत आणला.

वाकलेल्या कणामुळे भूल देणे कठीणअ‍ॅनेस्थेशिया विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. प्राची कोरडे यांनी भूल देण्याची प्रक्रिया अतिशय कौशल्याने हाताळली. त्यांनी सांगितले की, मुलीचा पाठीचा कणा खूप वाकलेला असल्यामुळे भूल देणे आणि शस्त्रक्रियेसाठी योग्य पद्धतीने ठेवणे हे खूप कठीण होते. पण अचूक नियोजन आणि अनुभवाच्या जोरावर हे आव्हान सुरक्षितपणे पार करण्यात आले.

शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यांचा मोलाचा वाटाशस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विविध विभागांतील तज्ज्ञाचा मोलाचा वाटा राहिला. यात डॉ. फिलिप्स अब्राहम, डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. अंजली बोरकर, डॉ. प्रियांका टिकैत, डॉ. राजीव सोनारकर, डॉ. सी. बोकाडे, डॉ. गौरव शर्मा, डॉ. इंद्रजा रॉय, डॉ. शुभम गुप्ता आणि नर्सिंग टीम आदींचा समावेश होता. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार व ‘सीएमएस’ डॉ. वसंत गावंडे यांनी डॉक्टरांच्या परिश्रमाचे कौतुक केले.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य