शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्काराचे सावट, जोरदार हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 11:09 IST

या सर्व प्रकारात नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने १२२.६१ कोटी रुपयांचे बिल थकल्याने शनिवारपासून कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

नागपूर : येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीबाबत नागपूर ते मुंबईपर्यंत जोरदार हालचाली सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी शहरातील अधिकाऱ्यांना बोलावून वेळेत दर्जेदार काम करण्याचे निर्देश दिले. नागपुरातही तयारीला वेग आला आहे. या सर्व प्रकारात नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने १२२.६१ कोटी रुपयांचे बिल थकल्याने शनिवारपासून कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.यासंदर्भात संघटनेने गुरुवारी मुख्य अभियंता दिनेश नंदनवार आणि अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांना निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की, मागील दोन वर्षांत खाते हेड २०५९ अंतर्गत ७३.७९ कोटी रुपये आणि २२१६च्या लेखाशीर्षाखाली ४८.९३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या कामांची बिले अद्याप अदा केलेली नाहीत. अशा स्थितीत काम करणाऱ्या ठेकेदारांची अवस्था बिकट झाली आहे. बँकेचे कर्ज भरता येत नाही, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. यामुळे कंत्राटदार तणावाखाली आहेत. मात्र, दिवाळी सुरू होऊनही विभागाला बिले भरण्यासाठी पैसे मिळाले नाहीत. या स्थितीत निविदा काढूनही त्यांना कामावर बहिष्कार टाकावा लागत आहे.   अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या शिष्टमंडळासमोरच मुंबईला फोन करून परिस्थितीची माहिती दिली. प्रलंबित बिले अदा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ठेकेदारांची जुनी बिले अदा करण्यात येणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर