शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मूख पूर्वकर्करोगाचे निदान, उपचार होणार अधिक सोपे

By सुमेध वाघमार | Updated: August 25, 2023 18:21 IST

नागपूरचे शासकीय दंत रुग्णालय मध्यभारतात ठरणार ‘मॉडेल’

नागपूर : सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ, जाहिरातींचा प्रभाव आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे शालेयसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने मुख पूर्वकर्करोगाचे वेळीच निदान व उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणाची सोय उभी केली आहे. शुक्रवारी याचे लोकार्पण करण्यात आले.       केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुपारी रुग्णालयाला भेट देत ‘टोबॅको सीजेशन सेंटर’, ‘सेंटर ऑफ एक्सेलेन्स फॉर ओरल प्रिकॅन्सर कँसर’ तसेच ‘सेंटर ऑफ एक्सेलेंस फॉर रिजनरेटिव्ह पेरिओडांटोलॉजी’चे उद्घाटन केले.  यावेळी मंचावर माजी आ. आशिष देशमुख, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, डॉ. मंजुषा वºहाडपांडे उपस्थित होते. संचालन डॉ. वैभर कारेमोरे यांनी केले. कार्यक्रमात माजी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

- प्रत्येक गावात ‘डेंटिस्ट’ची गरज

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, तंबाखुच्या वाढत्या व्यसानामुळे मुखाचे आजार वाढत आहे. मुखाचा आजाराचे वेळीच निदानासाठी प्रत्येक गावात डेंटिस्टची गरज आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने मुख पूर्वकर्करोगाचे निदान व उपचारासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी स्वदेशी उपकरणाचा निर्मितीसाठी सरकार प्रयत्नशील आहे.

- मुखाचा कॅन्सरवर ‘सीओटू’ उपचार पद्धती ठरणार वरदान

‘सेंटर आॅफ एक्सेलेन्स फॉर ओरल प्रिकॅन्सर, कॅन्सर’मधील ‘ओटू’ उपचार पद्धतीमार्फत मूख पूर्व कॅन्सर व मूखाचा कॅन्सरवर उपचार करणे शक्य झाले आहे. २० मिनीटांत टाकेरहित लेझर उपचारामुळे पंधरा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो. विभागप्रमुख डॉ.प्रशांत पंडलीवार यांनी, सांगितले की मुखकर्करोगाच्या रुग्णांसाठी हे उपकरण वरदान आहे. 

- मिनीटांत कळेल व्यसन सुटले की नाही

दंत रुग्णालयाच्या तळमजल्यावरच तंबाखू व्यसन मुक्ती केंद्र सुरू करण्यात आले. ओरल मेडिसीन अ‍ॅण्ड रेडिओलॉजी विभागच्या प्रमुख डॉ. अशिता कळसकर यांनी सांगितले, या केंद्रातील ‘कार्बन मोनोक्साईड (सीओ) मॉनिटर’च्या उपकरणाच्या सहाय्याने व्यक्तीच्या व्यसनाच्या प्रमाणाबाबत माहिती काही मिनीटांत मिळते.

- दातांचे कृत्रिम हाड तयार करणे अधिक सोपे

दंत परिवेष्टन शास्त्र विभागाचे डॉ. विवेक ठोंबरे म्हणाले, हिरड्यांच्या आजारामुळे दातांच्या हाडाची झीज होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय, अनेकवेळा कृत्रिम दाताचे रोपण करण्यासाठी पुरेसे हाड उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण होतात. यावरील उपचार व संशोधनासाठी ‘सेंटर ऑफ एक्सेलेंस फॉर रिजनरेटिव्ह पेरिओडांटोलॉजी’ विभाग स्थापन करण्यात आले. या विभागांतर्गत दातांचे कृत्रिम हाड निर्मिती करणे शक्य होईल. राज्यात अशाप्रकारचे हे पहिलेच केंद्र आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोगnagpurनागपूर