शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून बनविला शारीरिक संबंधाचा व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2023 20:40 IST

Nagpur News लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधांचा व्हिडिओ काढून तो मित्राला पाठवणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने जाब विचारला असता, तो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून नर्सिंगला शिकणाऱ्या प्रेयसीचा शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार करून तो मित्राला पाठविला. प्रेयसीने याबाबत विचारणा केली असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध लकडगंज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

हर्षल अनिल ढोके (वय २२, रा. वॉर्ड क्र. ५, बसस्टॉप मागे, सावनेर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. तो बीबीएला शिकत आहे. तर जरीपटका परिसरातील पिडीत १९ वर्षाची मयुरी (बदललेले नाव) नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. आरोपी हर्षल आणि मयुरीची ओळख मयुरीच्या मैत्रीणीच्या घरी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. इन्स्टाग्रामवर नियमित चॅटींग आणि फोनवर बोलणे सुरु झाल्यामुळे ते दोघे ऐकमेकांच्या प्रेमात पडले. याचा फायदा घेऊन आरोपी हर्षलने ३ मे रोजी मयुरीला भेटण्यासाठी सी. ए. मार्गावर बोलावले. जेवण करण्याच्या बहाण्याने तो मयुरीला हॉटेलच्या रुममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

केवळ शारिरीक संबंध प्रस्थापित करूनच तो थांबला नाही तर त्याने त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर १९ मे २०२३ रोजी तो मयुरीला सावनेरला घेऊन गेला. तेथे तिच्यासोबत पुन्हा शारिरीक संबंध प्रस्थापित केले. आरोपी हर्षलचा मोबाईल तपासताना त्याने शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार करून आपल्या मित्राला पाठविल्याचे मयुरीच्या लक्षात आले. तिने याबाबत त्याला विचारणा केली असता आरोपीने व्हिडीओ पाठविला तो आपलाच दुसरा मोबाईल नंबर असल्याचे मयुरीला सांगितले. परंतु तिला ही बाब पटली नाही. तिला शंका आल्यामुळे तिने खडसावून जाब विचारला आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावर आरोपी हर्षलने तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपी हर्षल आपला व्हिडीओ व्हायरल करू शकतो, अशी शंका आल्यामुळे मयुरीने लकडगंज पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. लकडगंज पोलिसांनी आरोपी हर्षलविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी