- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सातव्या इयत्तेतील एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षिका व शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
संघर्षनगर येथील राज गवई पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार झाला आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाअंतर्गत येणाऱ्या चाईल्ड हेल्पपाईन योजनेतील समुपदेशक मंगला टेंभुर्णे यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, २२ जानेवारी रोजी सातवीतील एका विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीला आरसा मागितला. त्यावरून शिक्षिका तसलीमने तिला बेदम मारहाण केली.त्यानंतर दोन्ही विद्यार्थिनींना वर्गखोलीच्या बाहेर उभे केले. त्यानंतर मुख्याध्यापिका नसरीन अख्तरने विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलविले व तू आमचे ऐकत नाही असे म्हणत तिला लोखंडी पट्टीने मारहाण केली. या प्रकारामुळे विद्यार्थिनीला मोठा मानसिक धक्का बसला. तिला जखम देखील झाली. तिने घरी हा प्रकार सांगितला.
तिच्या पालकांनी शाळेत जाऊन विचारणा केली व शिक्षिकेविरोधात कारवाईची मागणी केली. मात्र शाळेकडून कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर तिच्या पालकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जानेवारीला पोलिसांनी मेयो हॉस्पिटलमध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी केली. २७ जानेवारी रोजी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Web Summary : Nagpur: A teacher and principal are booked for assaulting a 7th-grade student at Raj Gavai Public School. The student was beaten for asking a classmate for a mirror. The principal further assaulted her with an iron rod, causing injury and trauma. Police have registered a case and seized CCTV footage.
Web Summary : नागपुर: राज गवई पब्लिक स्कूल में सातवीं कक्षा की एक छात्रा के साथ मारपीट करने पर एक शिक्षिका और प्रधानाध्यापिका के खिलाफ मामला दर्ज किया गया है। छात्रा को दर्पण मांगने पर पीटा गया। प्रधानाध्यापिका ने लोहे की छड़ से भी हमला किया, जिससे उसे चोटें आईं। पुलिस ने मामला दर्ज कर सीसीटीवी फुटेज जब्त कर लिया है।