शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनापूर्वी बनतेय पुरुष आमदारांसाठी स्वतंत्र 'डायनिंग रूम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:39 IST

आमदार निवासात तयारी जोरात : एकाच वेळी आठ आमदारांची व्यवस्था

कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील सरकार अजून स्थापन झाले नसले तरी हिवाळी अधिवेशनाची तयारी मात्र जोरात सुरू आहे. आमदार निवासात दुरुस्तीसह इतर कामे सुरू आहेत. यातच येथील कॅन्टीनमध्ये महिला आमदारांप्रमाणे पुरुष आमदारांसाठीसुद्धा स्वतंत्र अशी डायनिंगची व्यवस्था केली जात आहे.

अधिवेशनाच्या काळात आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बरीच गर्दी असते. त्यामुळे महिला आमदारांनी कॅन्टीनमध्येच स्वतंत्र डायनिंगची व्यवस्था करायची मागणी केली होती. त्यांची मागणी योग्य होती. त्यानुसार महिला आमदारांसाठी तशी स्वतंत्र डायनिंगची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे एकाच वेळी आठ महिला आमदार बसून जेवण करू शकतील, अशी ती सुविधा आहे. दुसरीकडे पुरुष आमदारांसाठी अशी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. कॅन्टीनमध्ये त्यांना इतरांसोबत बसूनच जेवण करावे लागायचे. त्यामुळे मागच्यावर्षीच पुरुष आमदारांनी डायनिंगची स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली होती. तेव्हा पुढच्या अधिवेशनात ही व्यवस्था देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आता तशी व्यवस्था केली जात आहे. कॅन्टीनला लागून असलेल्या जागेवर एका बाजूला पुरुष आमदारांसाठीसुद्धा स्वतंत्र डायनिंगसाठी केबीन तयार केले जात आहे. २० फूट लांब व ८ फूट रुंद हे केबीन पुरुष आमदारांसाठी राहील. यात सोफे लावण्यात येतील. एका वेळी ८ आमदार येथे बसून भोजन करू शकतील.

अधिकाऱ्याच्या प्रेमापोटी नियमांकडे दुर्लक्ष विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीत पीडब्ल्यूडीच्या विभाग एकच्या उपविभाग एकची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाची जबाबदारी सांभाळत असलेल्या अधिकाऱ्याला इतर कुठलाही पदभार दिला जात नाही, असा अघोषित नियम आहे. परंतु, उपविभाग एकच्या एका डेप्युटी इंजिनिअरवर इतके प्रेम आहे की, त्यांच्याकडे सब डिव्हिजन चारचाही प्रभार सोपविण्यात आला आहे. या अतिरिक्त प्रभाराची सध्या पीडब्ल्यूडीमध्ये चर्चा रंगली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन