शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डीतील देहव्यापाराच्या अड्ड्यावर धाड, महिलेस अटक

By दयानंद पाईकराव | Updated: March 16, 2024 16:23 IST

चार तरुणींची सुटका, मसाज पार्लरच्या नावाखाली चालायचा देह व्यापार.

दयानंद पाईकराव, नागपूर : मसाज पार्लरच्या नावाखाली सीताबर्डी परिसरात देह व्यापाराचा अड्डा चालविणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक करून चार तरुणींची सुटका केली आहे.

मुस्कान उर्फ मनिषा अरविंद भारती (३५, रा. वसंतविहार वाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला ही महिला मसाज पार्लरच्या नावाखाली देह व्यापाराचा अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी १५ मार्चला सायंकाळी ६.१५ वाजता सामाजिक सुरक्षा विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नॅचुरल युनिसेक्स सलून, पहिला माळा येथे धाड टाकली. तेथे आरोपी महिला मुस्कान ही आपल्या आर्थिक फायद्यासाठी तरुणींना पेशांचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेताना आढळली.

पोलिसांनी तेथून ४ तरुणींची सुटका केली. आरोपी महिलेकडून ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करून तिच्या विरुद्ध सीताबर्डी ठाण्यात कलम ४, ५, ७, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कविता इसारकर, लक्ष्मण चौरे, सचिन बढीये, शेषराव राऊत, अश्वीन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम, पुनम शेंडे यांनी केली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी