शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बापरे..! 656 फुटांचा दगड येतोय पृथ्वीच्या दिशेने, ताशी २५ हजार किमीचा वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 07:38 IST

अंतराळात घडणाऱ्या असंख्य घडामाेडींविषयी आपण अनभिज्ञ असलाे तरी त्या मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या  असतात.

नागपूर : अंतराळात घडणाऱ्या असंख्य घडामाेडींविषयी आपण अनभिज्ञ असलाे तरी त्या मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या  असतात. अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या अशाच एका संकटाचा इशारा अंतराळ वैज्ञानिकांनी दिला आहे. ६५६ फूट एवढ्या अवाढव्य आकाराचा दगड अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. ताे पृथ्वीवर धडकण्याची शक्यता कमी आहे; पण, तसे झाले तर काय? याकडे वैज्ञानिकांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकन अंतराळ संशाेधन संस्था नासाने याबाबतची माहिती दिली आहे. एखाद्या लघुग्रहाप्रमाणे असलेल्या या दगडाचा आकार ६५६ फूट म्हणजे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या दुप्पट आहे. जेव्हा ताे पृथ्वीजवळून जाईल, तेव्हा त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ४५ लाख किलाेमीटर असेल. सामान्य माणसांना हे अंतर खूप अधिक वाटत असले तरी अंतराळाच्या दृष्टीने ते अतिशय कमी आहे. विशेष म्हणजे, ताे जवळून जाणार असला तरी अंतराळातील वेळेवर घडणाऱ्या एखाद्या घडामाेडीमुळे त्याची दिशा बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

‘नासा’ने या दगडाला अंतराळातून येणाऱ्या ‘लघुग्रहा’च्या श्रेणीत टाकले आहे. अंतराळातील एखाद्या वस्तूचा पृथ्वीला धाेका निर्माण झाला तर वैज्ञानिक त्याला एस्टाेराॅइडच्या श्रेणीत टाकतात. या वेगाने येणाऱ्या अवाढव्य दगडापासून पृथ्वीवासीयांना सध्यातरी  धाेका नाही; पण, अशा दगडाने खराेखर पृथ्वीला धडक दिली तर आपली पृथ्वी या संकटाचा सामना करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे अशा संकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचा वैज्ञानिकांद्वारे प्रयत्न केला जात आहे.

२०२३ सीएल-३

‘२०२३ सीएल-३’ असे नाव या अंतराळ दगडाला वैज्ञानिकांनी दिले आहे. हा दगड ताशी २५ हजार किलाेमीटरच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असून, येत्या २४ मे राेजी ताे पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे.