शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपरमून’पूर्वी सुपर ‘शनी’चे कडे पाहण्याची संधी; टेलिस्कोपने पाहता येणार विलोभनीय दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 14:00 IST

२७ ऑगस्टला पृथ्वीच्या जवळ आणि अगदी सूर्यासमोर

नागपूर : येत्या ३१ ऑगस्ट राेजी खगाेलप्रेमींना ‘सुपर ब्ल्यू मून’चे दर्शन घडणार आहे; पण त्यापूर्वी अंतराळातील आणखी एक सुंदर अशा ‘शनी’ ग्रहाचे दर्शन नागरिकांना करता येईल. २७ ऑगस्टला शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ राहणार आहे. ग्रहाभाेवती गाेल फिरणाऱ्या वादळी कड्यांमुळे अतिशय विलाेभनीय असलेल्या शनी ग्रहाला दुर्बिणीने पाहण्याची संधी अवकाश निरीक्षक, अभ्यासक व खगाेलप्रेमींना मिळणार आहे.

शनी हा सूर्यमालेतील एक महत्त्वाचा ग्रह होय. शनीच्या भोवतीने असलेल्या कड्यामुळे शनीचे वेगळेपण खुलून दिसते. २७ ऑगस्टला शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ आणि अगदी सूर्यासमोर राहील. याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास शनी व पृथ्वी यांचे सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडी चांगल्या प्रकारे दिसू शकते. तथापि ही कडी साध्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. त्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागेल.

२७ ऑगस्ट रोजी सूर्य मावळल्यानंतर लगेच शनी ग्रह हा पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशामध्ये दिसेल. हा ग्रह रात्रभर काळसर व पिंगट रंगाचा व चमकदार दिसेल. त्यामुळे हा ग्रह ओळखता येईल. हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

ऑगस्ट महिन्यात आपला चंद्र दुसऱ्यांदा पृथ्वीच्या अगदी जवळ राहणार आहे. पहिल्यांदा १ ऑगस्ट राेजी पाैर्णिमेला ताे जवळ हाेता. एकाच महिन्यात दाेनदा पाैर्णिमा असल्याने त्यास ‘सुपरमून’ संबाेधले जाते. ३१ ऑगस्टचा चंद्र हा ‘सुपर ब्ल्यू मून’ असेल.

शनीची वैशिष्टे

  • शनी ग्रहाचा व्यास १.२० लाख किमी व तापमान शून्याखाली १८० अंश सेल्सिअस आहे. ग्रहाभाेवती वादळाचे गाेल कडे तयार झाले आहेत, ज्यामुळे ताे अत्याकर्षक वाटताे.
  • ही बर्फाची वादळी कडे चक्क २.७० लाख किमीपर्यंत पसरली असतात. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट आहे.
  • या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा करायला २९.५ वर्षे लागतात. शनीला एकूण ८२ चंद्र आहेत व टायटन हा त्याचा सर्वांत माेठा चंद्र हाेय.
टॅग्स :scienceविज्ञान