शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवर अश्लील चाळे, आणखी एका जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल

By दयानंद पाईकराव | Updated: July 20, 2024 17:14 IST

सदर पोलिसांची कारवाई : ४० सीसीटीव्ही तपासून घेतला आरोपीचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेयसीला पुढे बसवून दुचाकीवर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपी प्रियकर व प्रेयसीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

हर्ष उर्फ बिल्ली राजेश काहर (२१, रा. चंद्रमणी चौक, वाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याची २० वर्षाच्या प्रेयसीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी ११ जुलैला दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान आरोपी बिल्ली याने आपल्या प्रेयसीला दुचाकीवर समोर बसविले. त्यानंतर दुचाकीवर ते सदर परिसरात फिरून अश्लील चाळे करीत होते. सदरच्या कॅफेखोका रोडवर काही जणांनी त्यांचा व्हीडीओ तयार करून तो सोशल मिडियावर व्हायरल केला.

त्यानंतर सदर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, २९३, २९६, १२५, मोटार वाहन कायदा सहकलम ११०, ११२, ११७ नुसार गुन्हा दाखल करून तपास केला. सदर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन ठाकूर आणि पोलिसांनी परिसरातील ४० सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यातील एका फुटेजमध्ये आरोपीच्या दुचाकीचा वेग कमी झाल्यामुळे दुचाकीच्या नंबर प्लेटवरील केवळ तीन अंक दिसले. परंतु पोलिसांनी शक्कल लढवून १ ते १० पर्यंत आकडे टाकून १० दुचाकीचालकांची चौकशी केली असता आरोपी बिल्ली पोलिसांच्या हाती लागला. सदर पोलिसांनी त्याला अटक करून त्याची दुचाकी क्रमांक एम. एच. ४०, सी. यु-४८९४ किंमत ७० हजार रुपये जप्त केली आहे. आरोपी बिल्ली विरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात दोन घरफोडी व दोन आर्म्स अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल असून एमआयडीसी ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती सदर पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर