शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मेंढे, वंजारी, वाघमारे यांना दणका, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळले

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: August 12, 2025 12:17 IST

शालार्थ आयडी घोटाळ्यामधील आरोपी : वैशाली जामदार यांना जामीन मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू व माजी शिक्षण उपसंचालक सतीश बाबूराव मेंढे, राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष व तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण गुलाबराव वंजारी आणि नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वेतन विभागाचे निलंबित अधीक्षक नीलेश बाबूराव वाघमारे यांनी संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेले अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आले. नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जगन्नाथ जामदार यांना मात्र तांत्रिक कारणांमुळे जामीन मंजूर करण्यात आला.

न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला. मेंढे व वाघमारे यांनी अटकपूर्व जामिनासाठी तर, वंजारी व जामदार यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. घोटाळ्यातील आरोपींविरुद्ध सदर पोलिसांनी ११ एप्रिल २०२५ रोजी एफआयआर दाखल केला आहे. तसेच, राज्य सरकारने घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी आर्थिक लाभाकरिता संगनमत करून ५०० पेक्षा जास्त अपात्र शिक्षकांची नियुक्ती केली आहे. पराग पुडके यांची जेवनाळा येथील नानाजी पुडके विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी केलेल्या अवैध नियुक्तीची तक्रार झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पराग पुडके, नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, अधीक्षक नीलेश मेश्राम, लिपिक संजय बोदाडकर, लिपिक सूरज नाईक, परसटोला (गाेंदिया) येथील चंद्रभागा विद्यालयाचे शिक्षक महेंद्र म्हैसकर, अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) येथील शिक्षण संस्था संचालक राजू मेश्राम व भंडारातील राजश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चरण चेतुले या आठ आरोपींविरुद्ध सरकारची फसवणूक करणे, बनावट दस्तावेज तयार करणे, बनावट दस्तावेज खरे भासवून उपयोगात आणणे, कट रचणे इत्यादी गुन्ह्यांतर्गत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर