शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

महिनाभरात एसटीच्या वाहकाला गुलाबी नोटेचे दर्शनच नाही; प्रवाशांकडे दोन हजार रुपयांची नोटच दिसेना

By नरेश डोंगरे | Updated: October 3, 2023 20:00 IST

नागपूर जिल्ह्यात एसटीचे एकूण आठ आगार आहेत. त्यातील चार नागपूर शहरात तर चार आगार जिल्ह्यातील रामटेक, सावनेर, उमरेड आणि काटोल शहरात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिनाभरात एसटी बसेसचे नागपूर विभागातील एकूण उत्पन्न ११ कोटी, ४२ लॉक, १७ हजार, ६३७ रुपये झाले. मात्र, एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एकाही प्रवाशाने एसटीच्या वाहकाकडे तिकिट घेण्यासाठी दोन हजार रुपयाची नोट दिली नाही. काहीसे कुतुहलजनक असले तरी हे सत्य आहे. महिनाभरात एसटीच्या कोणत्याही वाहकाला दोन हजारांच्या गुलाबी नोटेचे दर्शनच झाले नाही.

नागपूर जिल्ह्यात एसटीचे एकूण आठ आगार आहेत. त्यातील चार नागपूर शहरात तर चार आगार जिल्ह्यातील रामटेक, सावनेर, उमरेड आणि काटोल शहरात आहेत. या आठ आगारातून एकूण ४३२ बसेस राज्यातील वेगवेगळ्या आगारात धावतात. अर्थात या सर्व बसेसवर वाहक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रवाशांकडून दोन हजारांची नोट २९ सप्टेंबरपर्यंतच स्विकारावी, असे आदेश एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, काय गंमत! गेल्या महिनाभरात दोन हजारांची एकही नोट घेऊन कुणी प्रवासी कोणत्या बसमध्ये तिकिट काढण्यासाठी वाहकाकडे आला नाही. त्यामुळे ४३२ बसेसमधील कोणत्याच वाहकाला सप्टेंबर महिन्यात दोन हजारांच्या गुलाबी नोटेचे दर्शनच झाले नाही.महिनाभरात कोणत्या आगाराचे किती उत्पन्न?अगार उत्पन्नघाटरोड आगार - १,४७,६९,५५९गणेशपेठ आगार - २,१२,०२,३४३इमामवाडा आगार - १,७२,६१,७५५वर्धमान नगर आगार - १,२६,८१,७९८उमरेड आगार - ९८,८१,३६५काटोल आगार - १,३१,४६,६४९रामटेक आगार - १,१८,८२,५१४सावनेर आगार - १,३३,९१,६५४ एसटीत मोठी नोट पाचशेचीएसटी महामंडळात विविध घटकातील प्रवाशांना प्रवास भाड्यात वेगवेगळी सवलत मिळते. त्यामुळे प्रवास मुल्य फारसे जास्त नसते. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी शंभरातून दोन चार जणच पाचशेंची नोट देतात. अन्य प्रवासी ५०, १००अथवा २०० रुपयांची नोट देऊन तिकिट काढतात. अर्थात एसटीच्या दैनंदिन व्यवहारात सर्वात मोठी नोट पाचशेंचीच असते, असेही वाहक सांगतात.'दोन हजाराची नोट असती तर कारनेच गेलो नसतो का साहेब',या संबंधाने वाहकांसोबत सहज चर्चा केली असता त्यांनीही बोलकी प्रतिक्रिया वजा माहिती दिली. आम्ही प्रवाशांना सहजपणे दोन हजारांची नोट असेल तर चालेल. तुम्हाला तिकिट मिळेल, असे म्हटले असता त्यांनी आमचीच फिरकी घेतल्याचे सांगितले. आमच्या जवळ 'दोन हजाराची नोट असती तर कारनेच गेलो नसतो का साहेब', असाही प्रतिप्रश्न केल्याचे वाहकांनी सांगितले.''एसटीने प्रवास करणारा गट सर्वसाधारण मध्यमवर्गिय असतो. त्यामुळे शक्यतो ही मंडळी प्रवासाला निघताना फार मोठी रक्कम किंवा चलनातील मोठी नोट जवळ बाळगताना दिसत नाही. ते तिकिट काढण्यासाठी शंभर, दोनशे आणि खूप झाले तर एखाद, दुसरा प्रवासी पाचशेच्या नोटाचा वापर करीत असल्याचा अनुभव आहे.''- श्रीकांत गभणेउपमहाव्यवस्थापक, एसटी, नागपूर

टॅग्स :state transportएसटी