शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाच्या नादात बसला विजेचा शॉक, १० वर्षीय मुलाचा कापावा लागला पाय

By सुमेध वाघमार | Updated: January 12, 2024 20:47 IST

मेडिकलमध्ये मृत्यूशी संघर्ष : उच्च दाबाचा विजेचा शॉकने ४५ टक्के जळाला

नागपूर :  नायलॉनच्या मांजामुळे गळे कापल्याचा घटना समोर येत असताना पंतगाच्या नादात एका दहा वर्षीय मुलाला उच्च दाबाचा विजेचा शॉक लागल्याने ४५ टक्के जळाला. यामध्ये त्याचा उजवा पाय कापावा लागला. त्याची प्रकृती चिंताजनक असून मेडिकलमध्ये मृत्यूशी संघर्ष करीत आहे.   समता नगर येथील रहिवासी असलेला चंदू (बदललेले नाव) १० जानेवारी रोजी सायंकाळी पतंग उडवित होता. प्राप्त माहितीनुसार, अचानक त्याचा पतंग उच्च दाबाचा विद्युत लाईनवर अडकला. तो पतंग काढण्याचा प्रयत्नात असताना उच्च दाबाबा विजेचा शॉक बसला. हा शॉक इतका भयानक होता काही क्षणातच तो ४५ टक्के जळाला. त्याचा उजव्या पायाची बोटेच उडाली. त्याचे दोन्ही हात आणि डावा पायसुद्धा जळाला. 

अशा स्थितीत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अक्षय सज्जनवार यांनी रुग्णाकडे धाव घेतली. प्लास्टिक सर्जन डॉ. नेहा गुप्ता व पेडियाट्रिक्स सर्जन डॉ. राजेंद्र सावजी यांनी उपचाराला सुरूवात केली. 

उजवा पाय नीळा पडला होतामेडिकलचा प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. पाटील यांनी सांगितले, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचा उजवा पाय नीळा पडल्याने गुरुवारी गुडघ्याच्यावरील पाय कापावा लागला. त्याचा उजव्या हाताचा खांद्याखालचा भागही नीळा पडल्याने तो कापावा लागला. त्याचा छातीपासून डावा हात व पाय जळाला आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. 

विजेचा तारा, खांबापासून दूर राहाविजेचा तारा किंवा खांबाला अडकलेली पंतग काढू नका. त्याचापासून दूर राहा. धोका होऊन जीवावर बेतू शकते. नायलॉनचा मांजाने पतंग उडवू नका. यामुळे तुमच्यासह इतरांचे गळे कापून जीव धोक्यात येऊ शकतो. पतंगाच्या नादात जळालेल्या १० वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर  वरीष्ठ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. त्याच्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया व औषधेपचार पूर्णपणे नि:शुल्क केला जात आहे. - डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक मेडकिल 

टॅग्स :nagpurनागपूर