शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन : ... नाही तर रंग पुन्हा सुना सुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:03 IST

काळाची पावले ओळखून बदल केला नाही तर कोणतीही कला टिकत नाही. तमाशा या पारंपरिक लोककलेबाबत असेच झाले का ही भीती व्यक्त होत असताना रघुवीर खेडकर या हरहुन्नरी कलावंताने या तमाशात जीव ओतला. तमाशात नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून नव्या रूपात घडविले. त्यांच्या या तुफान गाजलेल्या तमाशाची झलक शनिवारी रसिकांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनुभवली.

ठळक मुद्देखेडकरांच्या तमाशाला रसिकांची दाद : गण, गवळण, वगाचे नाविन्यपूर्ण दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काळाची पावले ओळखून बदल केला नाही तर कोणतीही कला टिकत नाही. तमाशा या पारंपरिक लोककलेबाबत असेच झाले का ही भीती व्यक्त होत असताना रघुवीर खेडकर या हरहुन्नरी कलावंताने या तमाशात जीव ओतला. तमाशात नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून नव्या रूपात घडविले. त्यांच्या या तुफान गाजलेल्या तमाशाची झलक शनिवारी रसिकांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनुभवली.पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच, रेशीमबाग मैदान येथे रघुवीर खेडकर व कलावंतांचा तमाशा सादर झाला. आई कांताबाई सातारकर यांच्या प्रेरणेतून तमाशा कलेत आलेल्या खेडकरांच्या संचात १३० पेक्षा अधिक कलावंत सहभागी आहेत. पारंपरिक तमाशात दिसणारे गण, गवळण आणि वगनाट्य येथेही होते, मात्र त्यांचे सादरीकरण नव्या रूपात दिसले. गण अर्थात ईश्वर स्तवनाने या तमाशाला सुरुवात झाली. ‘आधी गणाला रणी आणा, नाही तर रंग पुन्हा सुना सुना...’ या स्तवनाने नृत्याविष्कार करीत रसिकांच्या सेवेसाठी ईश्वराची साथ आणि आशीर्वाद राहण्याची कामना केली. तमाशा म्हटला की गवळण आलीच. त्यानुसार सजूनधजून मथुरेच्या बाजारी निघालेल्या गवळणी पुढे आल्या व एकेक करीत त्यांनी ओळखही दिली. अर्थात ही ओळख करून देण्यात ‘मावशी’ हे पारंपरिक पात्र पुढे होतेच. यादरम्यान कलावंतांनी २१ व्या शतकातील आधुनिक कृष्णलीला सादर केल्या, ज्यात गवळणींच्या मोहक नृत्याची झलक बघायला मिळाली. ‘गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा...’ हे दमदार नृत्य कलावंतांनी सादर केले. पुढे कलावंतांनी वगनाट्य सादर केले. मात्र या नाट्यात नेहमी तमाशात सादर होणारे कथानक नव्हते तर काही लोकप्रिय पारंपरिक आख्यायिका व आजच्या काळातील प्रसंगाचे चित्रण होते. महिषासूर वधाचा प्रसंग तसेच शिवाजी महाराज, भगतसिंग यांचे जीवन दर्शन आणि भारतीय जवानांची गाथा कलावंतांनी मांडली. पुढे आधुनिक रंगाचा हा तमाशा उत्तरोत्तर बहरत गेला. तमाशातील कलावंतांनी अभिनयाने, विनोदाने, गाण्याने, नृत्याने प्रेक्षकांची करमणूक केली.

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी