शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन; मुंबई-पुण्याबाहेरही आहे रंगभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:27 IST

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातसुध्दा कलाकार मोठ्या संख्येने पुढे येत असून अस्सल मातीतलं नाटक हे गावाकडून शहराकडे येत असल्याचं मत मुंबई पुण्याच्या बाहेरील रंगकर्मींनी नाट्य संमेलनात रविवारी झालेल्या परिसंवादात मांडले.

ठळक मुद्देमुंबईबाहेरील रंगकर्मींनी मांडले परिसंवादात जळजळीत वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाटक स्वांत सुखाय या उक्तीप्रमाणे मुंबई-पुण्यातच फक्त व्यावसायिक किंवा धंदेवाईक नाटक नसून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातसुध्दा कलाकार मोठ्या संख्येने पुढे येत असून अस्सल मातीतलं नाटक हे गावाकडून शहराकडे येत असल्याचं मत मुंबई पुण्याच्या बाहेरील रंगकर्मींनी नाट्य संमेलनात रविवारी झालेल्या परिसंवादात मांडले. मराठी रंगभूमी उणे मुंबई पुणे या परिसंवादात जमलेल्या मान्यवरांनी मुंबई- पुण्याबाहेरील रंगकर्मींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांनी सरकारशी बोलून ठोस पावलं उचलायला हवीत याबद्दल पुनरुच्चार केला.या परिसंवादात वामन पंडित, रजनीश जोशी, दत्ता पाटील, सलीम शेख, डॉ सतीश पावने, विवेक खेर, मुकुंद पटवर्धन ही मुंबई-पुण्याबाहेरील रंगकर्मी मंडळी सहभागी झाली होती. या गावाकडच्या सच्च्या रंगकर्मींना यावेळी बोलतं केलं पत्रकार राज काझी यांनी. मुकुंद पटवर्धन यांनी राज्यात होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा, बालनाट्यस्पर्धा यांवर भाष्य केलं. जोपर्यंत एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जाऊन या स्पर्धांना वेगळं रूप दिलं जाणार नाही तसेच दोन ते तीन सेंटरना एकत्र करून केल्या जाणाऱ्या स्पर्धांना जोपर्यंत वेगवेगळं केले जाणार नाही तोपर्यंत मुंबई-पुण्याबाहेरील कलाकाराला योग्य तो न्याय मिळणार नाही. ९० नाटकांमध्ये फक्त ३ नाटकं निवडणे हा कोणता न्याय, असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला. बाकी मान्यवरांनी अडचणींबरोबरच घडत असलेल्या बदलाबाबतही विस्तृत भाष्य केले. मुळात रंगभूमी म्हटलं की मुंबई- पुणे आता जरा नाशिकपर्यंत तरी म्हटली जाते. मात्र सध्याचं चित्र उलटं आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अस्सल कलाकारही मुख्य धारेत आपली चमक दाखवतायत. फक्त त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात लागणारी मोलाची मदत आणि योग्य साथ फार गरजेची आहे. शासन दरबारी राज्य नाट्य स्पर्धा आणि बालरंंगभूमीविषयी भयंकर उदासीनता आहे. त्याच त्याच पध्दतीने आणि नियमांनी आजही या स्पर्धा राबविल्या जात आहेत. त्यामुळे खरंच कलाकार हा मुंबई-पुण्याबाहेर पोहचेल का, असा प्रश्न पडतो. मुळात सध्या सोशल मीडियाच्या प्रसारामुळे जग जवळ आलेलं असल्याने मुंबई-पुण्याच्या बाहेरील रंगकर्मीही या उदासीन प्रवृत्तीला न बळी पडता बाहेर पडतायत आणि आपलं करिअर करतायत. मात्र ही अशी उदाहरणं हाताच्या बोटावर मोजता येणारी आहेत अशी खंत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

अनेक ठिकाणी नाट्यगृहच नाहीतप्रायोगिक, हौशी आणि बालरंगभूमीवर मुंबई पुण्याबाहेर काम करणारे रंगकर्मी हे रंगभूमीच्या प्रेमापोटी मिळेल त्या साधनात, अपुºया पैशात आपली नाटकाची आवड जपत असतात. मात्र वर्षानुवर्षे हे करणं एक तर शक्य नसतं किंवा ते त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यामुळे सरकारने अशा रंगकर्मींच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. मुंबई-पुण्याबाहेर नाट्यगृहांची अवस्थाही वाईट आहे. अनेक ठिकाणी नाट्यगृहच उपलब्ध नाहीत. मात्र तरीही जिद्दीने एका तडफेने हे रंगकर्मी नवनवीन कल्पना घेऊन दरवर्षी आपल्या नाटकांचे प्रयोग करत ़असतात. मात्र सरकारने गावातील या रंगकर्मींसाठी राज्य नाट्य स्पर्धा आणि इतर शासकीय स्पर्धांची बक्षिसाची रक्कमही दुपटीने वाढवण्याची गरज आहे. जेणेकरून या रंगकर्मींना पुढे जाऊन चांगलं नाटक करण्याची उर्मी मिळेल, असे मतही मान्यवरांनी यावेळी मांडलं. सुरेश भट सभागृहात झालेल्या या परिसंवादाला वामन केंद्रे, शफाअत खान अशा ज्येष्ठ नाट्यकर्मींचीही विशेष उपस्थिती होती.

टॅग्स :Natakनाटक