शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

श्रमिक स्पेशल; बिकट परिस्थितीतील ९७७ कामगार नागपूरहून लखनौला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:37 IST

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या सुचनेनंतर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरवरून लखनऊसाठी २४ कोचची श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आली.

ठळक मुद्देभोजनाची केली व्यवस्थारेल्वेस्थानकावर विविध जिल्ह्यातून पोहोचल्या बसेस

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे हजारो कामगार जागोजागी अडकुन पडले होते. यातील अनेक कामगार पायीच गावाकडे जात आहेत. परंतु आता राज्य शासनाने अर्ज केल्यानंतर रेल्वेच्या वतीने श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून त्यांना आपल्या गावाकडे पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या सुचनेनंतर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरवरून लखनऊसाठी २४ कोचची श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आली.श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीतून नागपुरातील २२७, चंद्रपूरचे २८९, वर्धाचे २२०, गडचिरोली येथील १०८, भंडाराचे १३७ असे एकुण ९७७ कामगार रवाना झाले. त्यांच्या कडून रेल्वेला तिकीटांच्या माध्यमातून ४ लाख ९३ हजार ३८५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. या कामगारांना विविध शेल्टर होम आणि ठिकाणांवरून ३० बसेसने नागपूर रेल्वेस्थानकावर आणण्यात आले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत कामगार रेल्वेस्थानकावर येणे सुरु होते. रेल्वेस्थानकावर या कामगारांना भोजन, पिण्याचे पाणी देण्यात आले. शारिरीक अंतर ठेऊन त्यांना श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत बसविण्यात आले. अजनी यार्डात ठेवण्यात आलेली श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सकाळीच निर्जंतुकीकरण करून नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आणण्यात आली. सायंकाळी ७.१५ वाजता नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांनी प्लॅटफार्म क्रमांक १ वर सायंकाळी ७.३० वाजता रेल्वेगाडी सुटल्यानंतर हात जोडून सर्व कामगारांना निरोप दिला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोडल अधिकारी शिरीष पांडे, अविनाश कातडे, निता चौधरी, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, आरपीएफचे निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव, दत्तु घाडगे, प्रवासी सुुविधा पर्यवेक्षक प्रविण रोकडे, लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक संदीप गोंडाणे आदी अधिकारी उपस्थित होते.तिकिटांचे पैसे घेणे चुकीचे : नितीन राऊत‘लॉकडाऊनमुळे ४० दिवस कामगारांचा रोजगार बुडाला. त्यांच्या खात्यात पैसे नव्हते. अशा स्थितीत रेल्वेने त्यांच्याकडून तिकिटांचे पैसे वसुल करणे चुकीचे आहे. याबाबत आपण आजच पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना माहिती दिली आहे. सोबतच नागपुरातून तसेच इतर ठिकाणावरून जाणाऱ्या कामगारांच्या तिकिटांसाठी आपल्या वतीने ५ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत शारीरीक अंतर ठेवण्याबाबत योग्य व्यवस्था न केल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.’माध्यमांना आत जाण्यापासून रोखले

श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीचे वृत्त््राांकन करण्यासाठी आलेल्या प्रसार माध्यमांना रेल्वेस्थानकाच्या आजुबाजुला रोखण्यात आले. चौकशी अंती रेल्वे प्रशासनानेच पोलिसांना अशा सुचना केल्याची माहिती मिळाली. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांना विचारना केली असता त्यांनी प्रसार माध्यमांना प्रवेश देण्यात येत नसून श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीबाबत प्रसिद्धीपत्रक पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांचे जे प्रतिनिधी रेल्वेस्थानकावर पोहोचले त्यांनाही प्लॅटफार्मवर जाण्यास रोखण्यात आले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस