शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात ९७ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 20:50 IST

महापालिकेच्या झोन स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात शहरातील ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झाल्याचे आढळून आले होते. यातील १०८ इमारती पाडण्यात आलेल्या आहेत. असुरक्षित १७३ इमारती अजूनही वापरात आहेत. यातील अतिधोकादायक असलेल्या ९७ इमारती १५ दिवसात पाडण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत.

ठळक मुद्देमनपाने पाडण्यासाठी बजावल्या नोटीस : १७३ असुरक्षित इमारतींचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या झोन स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात शहरातील ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झाल्याचे आढळून आले होते. यातील १०८ इमारती पाडण्यात आलेल्या आहेत. असुरक्षित १७३ इमारती अजूनही वापरात आहेत. यातील अतिधोकादायक असलेल्या ९७ इमारती १५ दिवसात पाडण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत.संबंधित इमारत मालकांना यापूर्वीही नोटीस बजावल्या असतानाही जीर्ण इमारती पाडण्यात आलेल्या नाहीत. अशा इमारत धारकाकडून प्रत्येकी २५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. पावसाळा आला की दरवर्षी जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर येतो. जीर्ण इमारतीमुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. महाल, इतवारी व गांधीबाग यासारख्या भागात सर्वाधिक जीर्ण इमारती आहेत.३५ इमारतींना दुरुस्तीचे आदेशवापरात असलेल्या परंतु धोकादायक अशा २५ इमारती खाली करून दुरुस्ती तर ३५ इमारतींना दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या इमारत मालकांना मागील वर्षीही नोटीस बजावण्यात आली होती. परंतु नोटीसनंतरही अनेकांनी दुरुस्ती केलेली नाही.पावसाळा आला की नोटीसमहानगरपालिका कायद्यानुसार राज्य शासनाच्या २०१५ च्या निर्देशानुसार मान्सूनपूर्व तयारीचा आढावा व तपासणी करून झोन अधिकाऱ्यांंना याबाबतचा अहवाल पाठवावयाचा आहे. त्यानुसार पावसाळा आला की, संबंधित जीर्ण इमारत मालकांना नोटीस बजावून खानापूर्ती करून अहवाल पाठविला जातो. त्यामुळे मागील अनेक वर्षांत धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली निघालेला नाही.मालक व भाडेकरू वादझोन कार्यालयांनी मालकांना इमारती पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादांमुळे बहुतेक जीर्ण इमारती अद्याप वापरात असून काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे मनपालाही कारवाई करता येत नाही.२० हजार इमारती ३० वर्षांपूर्वीच्यानागपूर शहरात २० हजाराहून अधिक इमारती ३० वर्षापूर्वीच्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार ३० वर्षावरील इमारतींचे आॅडिट करावे लागते. मात्र नागपूर शहरात या कायद्याचे सर्रास उल्लघन होत आहे. शहरात ६० वर्षाहून अधिक वर्षापूर्वीच्या इमारतींची संख्या हजाराहून अधिक आहे. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBuilding Collapseइमारत दुर्घटना