शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील ९० टक्के जमीन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 11:47 IST

नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ९०.१५ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना ६१४ कोटी ३० लाख रुपये मोबदला विभागातील ७०० हेक्टर आर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ९०.१५ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे. यामध्ये नागपुरातील ९५.२३ टक्के तर वर्धा जिल्ह्यातील ८७.९४ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.समृद्धी महामार्गासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील एकूण १ हजार ४३ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून यामध्ये खासगी वाटाघाटीने ८०२.८५ हेक्टर जमीन खरेदी करावयाची आहे. तर १८७.६७ हेक्टर शासकीय जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. विभागातील १ हजार १६० गटातील शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करावयाची असून त्यापैकी १ हजार ००६ गटातील शेतकऱ्यांकडून ७००.२८ हेक्टर आर जमीन प्रत्यक्ष खरेदी करण्यात आली आहे.जमीन खरेदीसाठी शेतकरी सभासदांना ६१४ कोटी ३० लाख ३३ हजार ८३१ रुपये अदा करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील २१ गावातील २८.४२ किलोमीटर जमिनीच्या खरेदीला सुरुवात झाली. यामध्ये २७९ गट क्रमांकातील २०२.१९ हेक्टर आर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. त्यापैकी २४९ गट क्रमांकातील शेतकऱ्यांनी १८७.१५ हेक्टर आर जमीन उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शेतकऱ्यांना २४५ कोटी ९२ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. जिल्ह्यात सरासरी ९५.२३ टक्के शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन उपलब्ध करून दिली आहे. तसेच ९७.५२ हेक्टर आर ही शासकीय जमीन असून १५.८३ हेक्टर आर हे वनजमिनीचे क्षेत्र आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील एकूण २८४.६७ हेक्टर आर जमीन उपलब्ध झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तालुक्यातील ३४ गावातील ६०.७३ किलोमीटर लांबीसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून यामध्ये ९०.१५ हेक्टर आर जमीन शासकीय तर ३४.७७ हेक्टर आर जमीन आहे. तसेच ६००.६६ हेक्टर आर जमीन खरेदी करण्यात येत आहे. ८८१ गट क्रमांकातील शेतकऱ्यांकडून खरेदीची प्रक्रिया करण्यात आली असून त्यापैकी ५१३.१३ हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे. या जमिनीचा मोबदला म्हणून ३६८ कोटी ३७ लक्ष ४६ हजार २९८ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात ८७.९३ टक्के जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सेलू तालुक्यातील १६ गावातील २५.१६ किलोमीटर, वर्धा तालुक्यातील १० गावातील २३.०९ किलोमीटर तर आर्वी तालुक्यातील ८ गावातील ११.६७ किलोमीटर महामार्गाच्या लांबीसाठी जमीन खरेदी करण्यात येत आहे. त्यापैकी आर्वी तालुक्यात ९०.१० टक्के, वर्धा तालुक्यात ९१.१४ टक्के तर सेलू तालुक्यात ८३.९८ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग