शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

नागपूर जि.प.मध्ये दिसणार ९० टक्के नवे चेहरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:38 IST

२०१२ मध्ये काढण्यात आलेले आरक्षण आणि सद्याच्या आरक्षणात ९० टक्के फरक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये यंदा ९० टक्के नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआरक्षणाचा मोठा फटका सदस्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे गणित बिघडले आहे. सर्कल पुनर्रचनेत काही मतदार संघ गायब झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गोतमारे व निशा सावरकर यांचे सर्कल सेफ आहे तर माजी उपाध्यक्ष शरद डोणेकर व माजी विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे यांचे सर्कल राखीव झाले आहे. माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांचा मेटपांजरा सर्कल सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांना संधी आहे. पण २०१२ मध्ये काढण्यात आलेले आरक्षण आणि सद्याच्या आरक्षणात ९० टक्के फरक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये यंदा ९० टक्के नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ५८ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी १० (महिला ५), अनुसूचित जमाती ७ (महिला ४), नामाप्र १६ (महिला ८) व सर्वसधारण प्रवर्गासाठी २५ (महिला १२) जागा राखीव झाल्या आहे.सर्कल पुनर्रचना व आरक्षणामुळे भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राकाँसह इतर पक्षाच्या विद्यमान सदस्यापुढे संकट निर्माण झाले आहे. अनेकांवर घरी बसण्याची वेळ येणार असून काहींनी आपल्या अर्धांगिनीला मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, समाजकल्याण सभापती दीपक गेडाम, कृषी व पशुसंवर्धन विभाग सभापती आशा गायकवाड, सत्तापक्ष नेता विजय देशमुख, विरोधी पक्षनेता मनोहर कुंभारे, काँग्रेसचे शिवकुमार यादव, शांताराम मडावी, उपासराव भुते, मनोज तितरमारे, पद्माकर कडू, नंदा नारनवरे, भाजपचे विनोद पाटील, रुपराव शिंगणे, अरुणा मानकर, सुरेंद्र शेंडे, जयकुमार वर्मा, कमलाकर मेंघर, केशव कुमरे, डॉ. शिवाजी सोनसरे आदी नेत्यांचा पत्ता साफ झाला आहे. ते आता कोणती भूमिका वठवितात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.दोन सभापतींना संधी, दोघांची गोचीजिल्हा परिषदेतील सभापतींचीही गोची झाली आहे. समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांचे चिचोली सर्कल सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांचे बेलोना सर्कल अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाले आहे. या तालुक्यातील इतर सर्कलमध्येही त्यांना संधी नाही. कृषी सभापती आशा गायकवाड (शिवसेना) यांचे कांद्री-सोनेघाट सर्कल सर्वसाधारण झाले आहे. महिला बाल कल्याण सभापती पुष्पा वाघाडे (बसपा) यांचे मकरधोकडा सर्कल सर्वसाधारण झाले आहे. त्यामुळे त्यांना संधी आहे. मात्र दोन्ही ठिकाणी सर्वसाधारण जागा झाल्यामुळे त्या स्वत: लढणार की त्यांचे पती रिंगणात उतरतात याकडे लक्ष लागले आहे.कुठे पत्नीला तर कुठे पतीला संधीकुही तालुक्यातील काँग्रेसचे माजी सदस्य उपासराव भुते यांचे मांढळ सर्कल व मनोज तितरमारे यांचे वेलतूर सर्कल, डॉ. शिवाजी सोनसरे यांचा सिल्ली सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाले आहे. भाजपचे जयकुमार वर्मा यांचे बेला सर्कल सर्वसाधारण महिला झाले आहे. पद्माकर कडू यांचे वायगाव सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या सर्कलमधून त्यांना संधी नाही. परंतु त्यांचा पत्नी रिंगणात दिसू शकतात. अरोली कोदामेंढी सर्कल नामाप्र झाले आहे. त्यामुळे शकुंतला हटवार यांचे पती अशोक हटवार यांना संधी आहे. माजी सभापती वर्षा धोपटे यांचे नगरधन-भांडारबोडी सर्कल सर्वसाधारण झाले आहे. त्यांचे पती नरेश धोपटे हे दोन वेळा जि.प. सदस्य राहिले आहेत. यावेळी ते रिंगणात उतरू शकतात.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक