शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विस्तारीकरणात एचसीएलला ९० एकर जागा : ६ हजार जणांना थेट रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 9:32 PM

मिहानमध्ये आयटी क्षेत्राचा विकास होत असून अनेक कंपन्यांनी आयटी अभियंतांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता एचसीएल टेक्नॉलॉजिस लि. ही कंपनी आता ९० एकरवर विस्तार करणार असून याद्वारे जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त जणांना आणखी रोजगार उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे१४० एकर जागेवर प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहानमध्ये आयटी क्षेत्राचा विकास होत असून अनेक कंपन्यांनी आयटी अभियंतांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता एचसीएल टेक्नॉलॉजिस लि. ही कंपनी आता ९० एकरवर विस्तार करणार असून याद्वारे जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त जणांना आणखी रोजगार उपलब्ध होणार आहे. कंपनी ३५० कोटींची गुंतवणूक करणार आहे.एचसीएलने सन २००३ मध्ये १४० एकर जागा विकत घेतली होती. आर्थिक मंदीमुळे एचसीएलने ९० एकर जमीन एमएडीसीला परत करण्याचा प्रस्ताव दिला होता. एचसीएलने १४० एकर जागेचे पैसे अदा केले होते. गेल्या दहा वर्षांत एचसीएलने मिहानमध्ये गुंतवणूक केली नव्हती. प्रकल्प सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एचसीएल कंपनीला युनिट सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. तेव्हा एचसीएलने पहिल्या टप्प्यात ५० एकर जागेवर युनिट सुरू केले. सध्या तिथे जवळपास दीड हजार युवक काम करीत आहेत. बीपीओ आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या दोन क्षेत्रांत एचसीएल काम करीत आहे.कंपनीला जगभरातून अधिक व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे कंपनीने ९० एकर जागा परत मागितली. तसा प्रस्ताव एमएडीसीला देण्यात आला, तो तातडीने मान्य करण्यात आला. त्यामुळे आता ९० एकर जागेकरिता केवळ सहयोग करार करण्यात येत आहे. त्यानंतर एचसीएलचा मिहानमधील प्रकल्प पश्चिम भारतातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असल्याचे एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विस्तारीकरणात टीसीएसनेही ५२ एकर जागेची मागणी केलीआहे.९० एकर जागेवर तीन वर्षांत युनिट उभे करण्यात येणार असून जवळपास सहा हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिला व दुसरा टप्प्या मिळून किमान दहा हजारांहून अधिक युवकांना एचसीएल रोजगार देणार आहे. या दोन्ही टप्प्यांत एचसीएल ४८० कोटींची गुंतवणूक करणार आहे.विस्तारित जागा हस्तांतरण आजविस्तारित जागा हस्तांतरण कार्यक्रम रविवार, १८ ऑगस्टला दुपारी ३.३० वाजता वर्धा रोड येथील हॉटेल ली मेरिडियनमध्ये होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एसएमई मंत्री नितीन गडकरी, आ. समीर मेघे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, एचसीएल टेक्नॉलॉजिसचे मुख्य मानव संशाधन अधिकारी अप्पराव व्ही.व्ही. आणि उपाध्यक्ष (कॉर्पोरेट) संजय गुप्ता उपस्थित राहतील.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर