शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

नागपूर रेल्वे स्थानकात सापडली ९८ जिवंत काडतुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:34 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर ९० जिवंत काडतुसे सापडल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या मेन्टेनन्स विभागात उघडकीस आली. यामुळे ही जिवंत काडतुसे कुणाची आहेत, कुणी येथे आणली, हे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमेन्टेनन्स विभागातील घटना : लोहमार्ग पोलीस, आरपीएफला मिळाली नियंत्रण कक्षातून सूचना

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर ९० जिवंत काडतुसे सापडल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या मेन्टेनन्स विभागात उघडकीस आली. यामुळे ही जिवंत काडतुसे कुणाची आहेत, कुणी येथे आणली, हे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या शेजारी मेन्टेनन्स विभाग आहे. या कार्यालयाच्या मागे हेल्परला बसण्यासाठी एक बैठक कक्ष आहे. येथे कार्यालयाची कागदपत्रे राहतात. नेहमीच्या पद्धतीने कंत्राटी कर्मचारी लीलाधर राऊत (३७) रा. मानकापूर या खोलीची सफाई करीत होता. आलमारीच्या खाली झाडू मारताना त्यास ही जिवंत काडतुसे मिळाली. याची सूचना राऊत याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. लागलीच रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. वरिष्ठ विभाग अभियंता धनंजय काणे हे लोहमार्ग पोलिसात पोहोचले. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, लोहमार्ग पोलीस सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवी वाघ, आरपीएफचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, हेड कॉन्स्टेबल गजानन शेळके, रोशन मगरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून काडतुसे ताब्यात घेतली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.कडक सुरक्षा असूनही काडतुसे आली कशी?मागील काही दिवसांपूर्वी पुलवामात आतंकवादी हल्ला झाल्यानंतर नागपूरसह देशभरात खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता लोकसभा निवडणुकीमुळे रेल्वेस्थानकावर कसून तपासणी सुरू आहे. नागपूर रेल्वेस्थानक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांच्या यादीत आहे. रेल्वेस्थानकावर कडेकोट बंदोबस्त असून सर्व अवैध प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. तरीसुद्धा तीन खर्ड्याच्या बॉक्समध्ये ९ एमएमची ९८ काडतुसे आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर