शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

९२ चे झालो तरी ‘नापास’ !

By admin | Updated: August 4, 2015 03:05 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. ९२

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. ९२ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या विद्यापीठाचा परीक्षा विभाग आज कोलमडला आहे. आॅगस्ट महिना उजाडल्यावर उन्हाळी परीक्षांचे सुमारे ४० टक्के निकाल प्रलंबित आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे निकालाची परीक्षेत आपण यंदा तरी उत्तीर्ण होऊ, असा संकल्प विद्यापीठ प्रशासनाने आज घ्यावा, अशी मागणी विविध स्तरावर होत आहे.नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यात सुरुवात झाली होती. परंतु सुरुवातीपासूनच काही ना काही अडचणी येत गेल्या. परीक्षा भवनातील अधिकाऱ्यांमध्ये नियोजनाचा पूर्णत: अभाव होता. प्रशासनाला महाविद्यालये, मूल्यांकन करणारे प्राध्यापक यांच्यावर वचक ठेवता आला नाही व त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विविध अभ्यासक्रमांच्या ९५६ परीक्षांपैकी केवळ ४७० निकाल जाहीर झालेले आहेत. विद्यापीठाकडून कधी महाविद्यालये, कधी तांत्रिक बाजू सांभाळणारी कंपनीकडे बोट दाखविण्यात येत आहे. निकाल कधी लागणार अशी विद्यार्थी विचारणा करीत असताना विद्यापीठातर्फे निकाल कधी जाहीर होणार, यासंबंधात एक वेळापत्रकच जाहीर करण्यात आले. परंतु त्याचे पालनदेखील झालेले नाही. या यादीप्रमाणे अनेक निकाल तर दोन आठवड्यांअगोदरच लागायला हवे होते. आता परीक्षा यंत्रणा पूर्णपणे दीक्षांत समारंभाच्या कामात लावण्यात आली आहे. त्यामुळे निकालांना आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचे ठरलेले उत्तर४निकाल कधी लागेल अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून ठरलेलेच उत्तर देण्यात येत आहे. निकाल लवकरच जाहीर होतील, विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे सांगण्यात येत आहे. शिवाय महाविद्यालयांकडेदेखील बोट दाखविण्यात येत आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुलगुरूंचा अनुभव कुठे गेला?४नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक असताना निकाल वेगाने लागत होते. निकालांचा हा ‘काणे पॅटर्न’ राज्यभरात कौतुकाचा विषय ठरला होता. आता डॉ.काणे हे स्वत:च कुलगुरू असल्याने परीक्षा प्रणालीला रुळावर आणण्यात त्यांची मौलिक भूमिका राहील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. परंतु ही अपेक्षादेखील फोल ठरली आहे. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पदभार स्वीकारून काहीच दिवस झाले आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारेपर्यंत निकालांना अगोदरच उशीर झाला होता. त्यामुळे ‘डॅमेज कंट्रोल’चे काम करण्यातच त्यांचा जास्त वेळ जात आहे.