शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मार्च महिन्यात सोन्याच्या गुंतवणुकीवर मिळाला ८.५ टक्के परतावा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 31, 2024 22:06 IST

गुंतवणूकदारांना फायदा : शुद्ध सोने जीएसटीाविना ६८,५०० रुपये

नागपूर : मार्च महिन्यात सोन्याच्या गुंतवणुकीवर ग्राहकांना तब्बल ८.५२ टक्के परतावा मिळाला. महिन्याभरात दहा ग्रॅम शुद्ध (२४ कॅरेट) सोने खरेदीवर ५,२०० रुपयांचा फायदा झाला. नागपूर सराफा बाजारात ३१ मार्चला शुद्ध सोन्याचे दर ६८,५०० रुपये तर तीन टक्के जीएसटीसह ७०,५५५ रुपयांच्या ऐतिहासिक दरावर पोहोचले. सोमवारी खुलत्या बाजारात दरवाढीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. शिवाय, चांदीच्या प्रति किलो दरातही ५,१०० रुपयांची वाढ होऊन भाव ७५,३०० रुपयांवर गेले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दरदिवशी होणाऱ्या घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारात दिसून येत आहे. दर कमी होण्याची प्रतीक्षेत ग्राहकांनी खरेदी थांबविली. केवळ आवश्यक प्रसंगासाठीच सोने खरेदी करीत आहेत. दरवाढीसाठी अनेक कारणे सांगितली जात आहेत. पण मुख्यत्त्वे अमेरिकेत बँकांच्या व्याजदरात कपात होण्याचे संकेत असल्याने भारतात सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे नागपूर सराफा बाजार असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांचे मत आहे. पुढे दर कमी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. गुढीपाडव्यापर्यंत जीएसटीविना दर ७० हजारांवर जाण्याचे संकेत आहेत.

सोन्यात अशी झाली चढउतार १ मार्च २०२४ रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे (२४ कॅरेट ९९.५ टक्के) दर ६३,३०० रुपये होते. २९ फेब्रुवारीच्या तुलनेत या दिवशी ३०० रुपयांची वाढ झाली. २ मार्चला ७०० रुपयांची वाढ झाली, तर ३ रोजी भाव पुन्हा १०० रुपयांनी वाढून ६४ हजारांवर पोहोचले. ५ मार्चला १,१०० रुपयांची घसघसीत वाढ होऊन सोने ६५,१०० रुपयांवर पोहोचले. तर ६ मार्चला २०० रुपयांनी घसरले. ७ मार्चला ५०० रुपयांची वाढ झाली. ११ आणि १२ रोजी भाव स्थिर होते. २० मार्चपर्यंत चढउतार होऊन भाव ६६ हजारांवर पोहोचले. २१ मार्चला तब्बल १,२०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ६७,२०० रुपयांवर गेली. २३ मार्चपर्यंत भाव ६६,४०० रुपयांपर्यंत कमी झाले. २६ मार्चनंतर पुन्हा दरवाढ झाली. २७ रोजी ६७ हजार, २८ रोजी ६७,५०० रुपये तर २९ आणि ३० मार्च रोजी सोन्याचे भाव ६८,५०० रुपयांवर स्थिर होते.

सोने दराचा तक्ता :दिनांक सोने दर१ मार्च ६३,२००२ मार्च ६३,९००४ मार्च ६४,०००५ मार्च ६५,१००६ मार्च ६४,९००७ मार्च ६५,४००९ मार्च ६५,९००१५ मार्च ६५,८००१८ मार्च ६५,५००२० मार्च ६६,०००२१ मार्च ६७,२००२३ मार्च ६६,४००२६ मार्च ६६,९००२७ मार्च ६७,०००२८ मार्च ६७,५००३० मार्च ६८,५००(३ टक्के जीएसटी वेगळा)