शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मनपा शाळांचा ८४.४१ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:45 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर महापालिकेच्या शाळांचा तिन्ही विभागाच्या निकालाची सरासरी टक्केवारी ८४.४१ इतकी आहे.

ठळक मुद्देगुणवंतांचा गौरव : विज्ञान शाखेतून धम्मदीप गौरकर, कला शाखेतून शिरीन परवीन तर वाणिज्य शाखेतून सालेहा अंजुम व रफानाझ अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर महापालिकेच्या शाळांचा तिन्ही विभागाच्या निकालाची सरासरी टक्केवारी ८४.४१ इतकी आहे. विज्ञान शाखेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी धम्मदीप धर्मपाल गौरकर याने ७६.४६ टक्के, कला शाखेतून साने गुरुजी उर्दू उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी शिरीन परवीन हमीद खान हिने ८१.५४ टक्के तर वाणिज्य शाखेतून एम. ए. के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी सालेहा अंजुम आणि रफानाझ यांनी प्रत्येकी ७८.१५ टक्के गुण मिळवून संयुक्त प्रथम येण्याचा मान पटकावला.विज्ञान शाखेतून प्रथम तिन्ही विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेतील आहेत. या शाखेत मृणाल सुधाकर पानतावणे याने ७४ टक्के गुणासह दुसरा तर नकुल ज्ञानेश्वर ठाकरे याने ७३.६९ टक्के गुणासह तिसरा क्र मांक पटकाविला. कला शाखेतून साने गुरुजी उर्दू उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी सुमेला परवीन मो. जफर खान हिने ७७.८५ टक्के गुण मिळवून दुसरा तर एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेच्या शायदा बेगम हिने ७१.२३ गुणासह तिसरा क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेतून एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची शबीना परवीन हिने ७५ टक्के गुणासह दुसरा क्रमांक पटकाविला.महापौर कक्षात आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्याचे कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, बसपाचे पक्षनेते मोहम्मद जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका प्रमिला मंथरानी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना दीपराज पार्डीकर, तानजी वनवे व दिलीप दिवे आदींनी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा