शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वीज बिलाची थकबाकी ८३ कोटी रुपये; वसुलीसाठी वरिष्ठ अधिकारीही मैदानात

By आनंद डेकाटे | Updated: December 29, 2023 19:47 IST

महावितरणला टेंशन

नागपूर : जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर थकबाकी ८३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यातील निम्मी थकबाकी ही पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची आहे. थकबाकी वाढल्याने महावितरणचे टेन्शन वाढले आहे. वसुलीसाठी वरिष्ठ अधिकारीही मैदानात उतरले असून नागरिकांना बिले भरण्याचे आवाहन करत आहेत. थकबाकीदारांची वीजही कापली जात आहे.

जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी ३०० कोटी रुपयांचे वीज बिल वितरित होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. सध्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ७० कोटी रूपये तर एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहे. गेल्या महिन्यात १०० कोटी रूपयाची थकबाकी होती. त्या तुलनेत या महिन्यात परिस्थिती थोडी सुधारली असली तरी महावितरणचा ताण कायम आहे.वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे. या मोहिमेत महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्यासह अनेक अभियंते, अधिकारीही मैदानात उतरले आहेत.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी महाल भागातील जानकीनगर, तुळशीबाग व परिसरातील अनेक थकबाकीदार ग्राहकांची भेट घेत, थकबाकीचा भरणा त्वरित करण्याचे आवाहन केले. याशिवाय थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनीदेखील आपल्या सहकाऱ्यांसोबत आज सावनेर विभागाअंतर्गत सुरू असलेल्या थकबाकी वसुली मोहिमेत भाग घेत, थकबाकीदार ग्राहकांची भेट घेत वीजबिलाचे पैसे त्वरित भरण्याचे आवाहन केले.

शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार

वीज ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी ३० व रविवारी ३१ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. यासोबतच वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर