शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वर्षभरात एसटीचे ८१ अपघात ; नागपूर विभागातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 11:22 IST

नागपूर विभागातील वर्षभरात झालेल्या अपघातांवर नजर टाकली असता वर्षभरात नागपूर विभागात ८१ अपघात घडल्याची धक्कादायक माहिती आहे

ठळक मुद्दे७ जणांचा मृत्यू, ४६ गंभीर अपघात

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असल्यामुळे प्रवासी एसटी बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु एसटीच्या नागपूर विभागातील वर्षभरात झालेल्या अपघातांवर नजर टाकली असता वर्षभरात नागपूर विभागात ८१ अपघात घडल्याची धक्कादायक माहिती आहे. यात ४६ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले असून २८ किरकोळ अपघाताची नोंद एसटी महामंडळाने केली आहे.अपघातावर एसटी महामंडळाच्या उपाययोजनाअपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने प्रत्येक चालकाला रिफ्रेशर कोर्सद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. चालकांची भरती प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना ४८ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर चालकांच्या तीन परीक्षा घेण्यात येतात. ड्यूटीवर रुजू झाल्यानंतरही सुरक्षित वाहन चालविण्यासाठी चालकांना ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते. एसटी महामंडळात चालकांना सतत प्रशिक्षण देण्यात येते.

दुचाकीचालकांनी काळजी घ्यावी‘पूर्वीपेक्षा एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. सर्वाधिक अपघात एसटी बस आणि दुचाकीचे होतात. एसटीची बस ही दुचाकीच्या तुलनेत मोठी असल्यामुळे दुचाकीचालकांनीसुद्धा काळजी घेऊन बसला जाऊ द्यावे. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल.’-शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक,एसटी महामंडळ, नियंत्रण समिती ३, मुंबई

टॅग्स :Accidentअपघात