शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची मृत्यूशी झुंज, संपत्ती हडपून मुलांनी सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 15:23 IST

कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची जमीन हडपून पाच मुलांनी तिला वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार कुही तालुक्यातील पाचगाव येथे उघडकीस आला आहे.अतिशय भयावह परिस्थितीत त्या वृद्धेची मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.

ठळक मुद्देपाच मुले असुनही निराधारसंपत्ती नावावर करून झाले पसार

नागपूर : म्हातारपण हे माणसाचं दुसरं बालपण असते अस म्हणतात. या काळात व्यक्तिंना आपुलकीची मानसिक आधाराची गरज असते. मात्र, आजकाल अनेकजण आपला फायदा निघाल्यानंतर आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून पळ काढतात. असाच एक प्रकार कुही तालुक्यातील पाचगाव येथे उघडकीस आला आहे. कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची जमीन हडपून पाच मुलांनी तिला वाऱ्यावर सोडले असून अतिशय भयावह परिस्थितीत त्या वृद्धेची मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.

कुही पाचगाव येथील इंदिराबाई हटवार (वय ८०) यांना कॅन्सरसारखा गंभीर आजार जडला. आजारात मुले सेवा करतील या आशेने वृद्धेने आपली संपत्ती पाच मुलांच्या नावे करून दिली. मात्र, जमीन मिळाल्यावर पाचही मुलांनी आजारी आईची सेवा करण्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, त्यांचा आजार गंभीर होऊन त्याची दुर्गंधी येऊ लागल्यावर मुलांनी तिला जेवण, पाणी देण्यासही नकार दिला. त्या वृद्धेची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्यांना स्वत:च्या पायावरदेखील उभ राहता येत नाही. अशातच, मुलांनी केलेल्या अमानवीय व्यवहाराने ही वृद्धा खचून गेली, त्यांनी याबाबत आपल्या मुलीच्या मुलाला माहिती दिली. 

नातू राजेश बावनकुळे याने वृद्धेला धंतोलीतील एका सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले. राजेश सध्या आजीची सेवा करीत आहे. दरम्यान, वृद्धेच्या मुलांनी त्यालाही शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मात्र, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे नातू राजेश बावनकुळे याने सांगितले. 

सध्या, या आजींवर नागपुरातील एका सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. याप्रकरणी नातू राजेशने पत्रपरिषद घेऊन वृद्धेच्या मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकHealthआरोग्यcancerकर्करोगSenior Citizenज्येष्ठ नागरिक