शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

८० उमेदवारांचे अर्ज बाद, १२९४ मैदानात ! आज माघारीनंतर लढतीचे चित्र होणार स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:41 IST

Nagpur : महापालिका निवडणुकीसाठी ३८ प्रभागांतून दाखल झालेल्या १३७४ उमेदवारी अर्जाची बुधवारी सर्व १० निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननीची प्रक्रिया पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका निवडणुकीसाठी ३८ प्रभागांतून दाखल झालेल्या १३७४ उमेदवारी अर्जाची बुधवारी सर्व १० निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननीची प्रक्रिया पार पडली. यात विविध कारणाने ८० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे रिंगणात १२९४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. परंतु अर्ज माघारीनंतर नेमके किती जण निवडणूक लढवणार, हे स्पष्ट होईल.

महापालिका निवडणुकीत यंदा उमेदवारांचा चांगलाच उत्साह दिसत आहे. प्रत्येकाने आपापले अर्ज दाखल करण्यापूर्वी त्याची चांगल्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली. काहींनी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच तपासणी करून घेतल्याने राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे बहुतांश उमेदवारांचे अर्ज छाननीच्या प्रक्रियेत वैध ठरले आहेत. शुक्रवारी (२ जानेवारी) उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेनंतरच खरे उमेदवार किती, याचा अंदाज येणार आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या छाननीमध्ये महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील सर्वाधिक १८ उमेदवारांची अर्ज बाद ठरले आहेत. तर सर्वात कमी गांधीबाग झोनमधील फक्त एक अर्ज बाद ठरला आहे.

आशीनगरात १८० उमेदवारी अर्ज सर्वाधिक

१५१ जागांसाठी १३७४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक १८८ उमेदवारी अर्ज आशीनगर झोनमध्ये दाखल करण्यात आले आहेत. यातील ८ अर्ज बाद ठरल्यानंतरही १८० अर्ज वैध ठरले आहेत. सर्वात कमी ७८ उमेदवारी अर्ज लक्ष्मीनगर झोनधून दाखल करण्यात आले असून, ३ अर्ज बाद ठरले तर प्रभागात ७५ अर्ज वैध ठरले आहेत.

झोन                  अवैध अर्ज          वैध अर्ज

  • लक्ष्मीनगर             ३                    ७५
  • धरमपेठ               १६                  १०७
  • हनुमाननगर          १४                   ११३
  • धंतोली                  ७                   १२२
  • नेहरूनगर             ५                   १४४
  • गांधीबाग               १                    १३९
  • सतरंजीपुरा            ४                   १२४
  • लकडगंज              ४                   १३७
  • आशीनगर              ८                  १८०
  • मंगळवारी             १८                  १५३
  • एकूण                   ८०                 १२९४
English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Election: 80 Applications Rejected, 1294 Remain Before Final Picture

Web Summary : During scrutiny for Nagpur Municipal Corporation elections, 80 applications were rejected, leaving 1294 candidates. The final number contesting will be clear after withdrawals. A total of 1374 applications were received for 151 seats across 38 wards. Aashinagar zone has the most valid applications.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026Municipal Corporationनगर पालिका