शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अंबाझरी परिसरातील ८० टक्के भाग मुक्त : अखेर मनपा आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्र केले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:37 IST

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ८ मे रोजी पश्चिम नागपुरातील धरमपेठ झोन क्षेत्रातील ट्रस्ट ले-आऊट क्षेत्र कंटेन्मेंट घोषित करण्यात आले होते. २२ मे रोजी प्रतिबंध हटविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानतंरही प्रतिबंध न हटविल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. आ. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून निर्बंध हटविण्याची मागणी केली. तर नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनीही महापालिका आयुक्तांकडे पत्र देऊन मागणी केली होती. अखेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ट्रस्ट ले-आऊट भागातील ८० कंटेन्मेंट क्षेत्र हटविण्याचे आदेश गुरुवारी जारी केले.

ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ८ मे रोजी पश्चिम नागपुरातील धरमपेठ झोन क्षेत्रातील ट्रस्ट ले-आऊट क्षेत्र कंटेन्मेंट घोषित करण्यात आले होते. २२ मे रोजी प्रतिबंध हटविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानतंरही प्रतिबंध न हटविल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. आ. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून निर्बंध हटविण्याची मागणी केली. तर नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनीही महापालिका आयुक्तांकडे पत्र देऊन मागणी केली होती. अखेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ट्रस्ट ले-आऊट भागातील ८० कंटेन्मेंट क्षेत्र हटविण्याचे आदेश गुरुवारी जारी केले. यामुळे परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ट्रस्ट ले-आऊट परिसरात बाधित रुग्ण आढळून आला होता. परंतु सुदामनगरी, हिलटॉप, पांडराबोडी, संजयनगर, गवळीपुरा, बाजीप्रभूनगर आदी वस्त्यांमध्ये बाधित रुग्ण नसतानाही हे क्षेत्र सील करण्यात आले होते. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने मोलमजुरी करणारे, नोकरदार, व्यावसायिक, दुधाचा व्यवसाय करणारे अडणीत आले होते. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जाता येत नव्हते. जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. यामुळे नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली.२३ व २४ मे रोजी आ. ठाकरे यांच्यासह या भागातील नागरिकांनी आंदोलन केले. २५ मे रोजी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तसेच विभागीय आयुक्तांना निवेदन देत बाधित रुग्ण नसलेल्या भागातील प्रतिबंध हटविण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विभागीय आयुक्तांना फोन करून आवश्यक त्या सूचना दिल्या. याच वेळी विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत बठक झाली. तीत विभागीय आयुक्तांनी प्रभावित क्षेत्र वगळून इतर भागातील सील हटिवण्याचे आश्वस्त केले होते. तर दुसरीकडे नियमानुसार २८ दिवसपर्यंत सील उघडता येणार नाही, अशी भूमिका मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली होती. अखेर गुरुवारी मनपा आयुक्तांनी ट्रस्ट ले-आऊट परिसरातील ८० टक्के भागातील प्रतिबंध हटविण्याचे आदेश जारी केले.विधानसभेत लक्षवेधी लावणार : ठाकरेकंटेन्मेंट क्षेत्राच्या नियमानुसार या क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक सेवा उपलब्ध केल्या पाहिजे. वास्तविक ट्रस्ट ले-आऊट क्षेत्रात बाधित रुग्ण आढळला होता. हिलटॉप, पांढराबोडी, सुदामनगरी, राजीवनगर, गवळीपुरा, बाजीप्रभूनगर आदी वस्त्यात गरज नसतानाही प्रतिबंध लावून मनपा प्रशासनाने नागरिकांचा मानसिक छळ करून त्यांना वेठीस धरले. यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी लावून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी सांगितले.फुके यांनीही केले आंदोलनपांढराबोडी परिसरातील मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपकार्तील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या परिसरातील निर्बंध हटविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी २५ मे रोजी मनपा आयुक्त मुंढे यांना पत्र पाठवून केली होती. निर्बंध न हटविल्यास अंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर गुरुवारी दुपारी आमदार डॉ. परिणय फुके व नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांनी हिलटॉप परिसरात आंदोलन करून या भागातील निर्बंध हटविण्याची मागणी केली. आंदोलनात परिसरातील नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी नारेबाजी करीत महापालिकेने रस्ते बंद करण्यासाठी लावलेले टिन व कठडे तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आ. फुके यांनी झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वºहाडे यांना आंदोलनस्थळी बोलावून प्रतिबंध न हटविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagitationआंदोलन