शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ८ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; परिवहन मंत्र्यांची माहिती

By योगेश पांडे | Updated: December 10, 2025 18:00 IST

२०२९ पर्यंत सर्व बस डेपोंचा कायापालट करणार

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यातील परिवहन व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी वर्षभरात ८ हजार नवीन एसटी बसेस घेण्यात येणार आहेत. तीन हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या वर्षात उर्वरित बसेसची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाई जगताप, बंटी पाटील यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांची प्रलंबित देयके अदाय करण्याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. त्याच्या उत्तरादरम्यान सरनाईक यांनी ही माहिती दिली.

एसटी सेवा ही कुठल्याही प्रकारच्या फायद्यासाठी चालविली जात नाही. शासनाच्या विविध योजनांमुळे उलट महामंडळाला नुकसानच सहन करावे लागते. मात्र जनतेचे हित जास्त महत्त्वाचे आहे. २०४७ पर्यंत डिझेलवरील सर्व बसेसची जागा इलेक्ट्रीक बसेस घेतील. तसेच दोन महिन्यांत राज्यातील २१६ एसटी डेपोच्या विकासाची प्रक्रिया सुरू होईल. पीपीपी मॉडेलअंतर्गत हा विकास होईल. २०२९ पर्यंत राज्यातील सर्व एसटी डेपोंचा कायापालट करण्यात येईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे व कामगारांना डबल शिफ्टदेखील करावी लागते. मात्र तात्पुरत्या पद्धतीवर अडीच हजार चालक घेण्यात येतील व लवकरच कायमस्वरुपी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. पुरवणी मागण्यांमध्येदेखील महामंडळाला २ हजार ८९३ कोटी रुपये मिळणार आहे. त्यातील बहुतांश निधी कामगारांचे वेतन व थकीत देयके अदा करण्यासाठी वापरण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : 8,000 New ST Buses to Ply Roads: Transport Minister

Web Summary : To strengthen transportation, 8,000 new ST buses will be added. Tenders for 3,000 buses are complete. All diesel buses will be replaced by electric by 2047. 216 ST depots will be developed via PPP model. Employee shortages addressed by temporary hires and permanent recruitment, with funds allocated for salaries.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनpratap sarnaikप्रताप सरनाईकstate transportएसटीState Governmentराज्य सरकार